5.5 C
New York

Sharad Pawar : चिंचवडला सोन्याचे दिवस आणू, शरद पवारांचा चिंचवडकरांना शब्द…

Published:

भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly) मतदारसंघात शरद पवारांची (Sharad Pawar) आज सभा झाली. यावेळी त्यांनी महायुतीवर (Mahayuti) जोरदार टीका केली. गेल्या दहा वर्षांपासून ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना चिंचवडचा विकास करता आला नाही, मुलभूत सुविधांअभावी इथल्या अनेक आयटी कंपन्या बाहेर गेल्या, हजारो लोकांचा रोजगार हिरावल्या गेला, अशा शब्दात त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. राहुल कलाटेंना (Rahul Kalate) एकदा संधी द्या, चिंचवड मतदारसंघाला सोन्याचे दिवस आणू, असंही ते म्हणाले.

Sharad Pawar महाराष्ट्राचं चित्र बदलण्याची गरज…

राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभेची निवडणूक आली. राज्याचा राज्य कारभार कुणाच्या हातात द्यायाच याचा निकाल तुम्ही या निवडणुकीत देणार आहात. गेल्या पाच -सात वर्षात महाराष्ट्राच चित्र फारसं चागंल नाही. एक काळ असा होता की, देशात महाराष्ट्र नंबर एकच राज्य होतं, यशवंतराव चव्हाणापासून अनेकांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. प्रत्येकांने राज्यतील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, आणि राज्य नंबरवन कसं राहिलं, यासाठी प्रयत्न केला.

महालक्ष्मी योजनेबाबत राहुल गांधींचे महत्वाचे वक्तव्य …

Sharad Pawar चिंचवडचा चेहरा खराब होत चालला…

पुढं ते म्हणाले, अलीकडच्या काळात ही सत्ता काही ठराविक लोकांच्या हातात आली आणि चित्र बदललं. पूर्वी पिंपरी-चिंचवड हा परिसर विकसित होता. इथं अनेक उद्योग-धंदे उभारले, अनेकांच्या हाताला काम दिलं. आयटी पार्क उभं केलं. मात्र, आता या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत चालला, असं पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसाठी मी उभा होता, तेव्हा चिंचवड विधानसभेचा बराच भाग माझ्या मतदारसंघात होता. अलीकडे माझा संपर्क कमी झाला. मुलभूत गरजांसदर्भात इथं फारसं काम झालं नाही. त्यामुळं 30 टक्के आयटी कंपन्यांनी इथून पाय काढून घेतला. परिणामी, अनेकांचे रोजगार गेले. सत्तेचा विनियोग प्रश्न सोडवण्यासाठी या महायुती सरकारने केला नाही. आता ही अवस्था बदलायची असेल तर परिवर्तन गरजेचं आहे. त्यासाठी राहुल कलाटेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असं आवाहन करत चिंचवडला पुन्हा सोन्याचे दिवस आणू, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img