महायुतीने (Mahayuti) अडीच वर्षांच्या काळात शेतकरी व गोरगरिबांची क्रूर थट्टा केली आहे. संविधानविरोधी सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, जातीपातीत तेढ निर्माण करून राजकीय नेत्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा घणाघात काँग्रेस पक्षाच्या फायरब्रॅंड नेत्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी प्रचारसभेत केला.
सत्ताधाऱ्यांच्या काळात राज्यातील जनतेवर सर्वाधिक अत्याचार महायुती सरकारच्या काळात झाला, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी प्रचारसभेत केला. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरभरून साथ द्या, असेही त्या म्हणाल्या. बुधवारी शेंदोळा बुद्रुक, फत्तेपूर, शिवणगाव, शेंदोळा धसकट, सालोरा, धोत्रा, वहा शेंदूरजना बाजार, तळेगाव ठाकूर या गावातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यशोमती ठाकूर गावोगावी प्रचार पदयात्रा काढून नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. या भेटीदरम्यान त्यांच्याशी संवाद साधून निवडणुकीमध्ये आपल्या कामाच्या आधारावर निवडून देण्याचे आवाहन यशोमती ठाकूर करीत आहेत.
महालक्ष्मी योजनेबाबत राहुल गांधींचे महत्वाचे वक्तव्य …
यशोमती ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावात जाऊन आपला प्रचार सुरू ठेवला आहे. दरम्यान, येत्या २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असल्याने आता काही दिवस शिल्लक राहिले असल्याने ठाकूर यांचा प्रचार जोमात सुरू आहे. त्यांना सर्वच गावात मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे यशोमती ठाकूर यांचे कामच त्यांच्या विजयाचे गुपित ठरेल, असे चित्र संपूर्ण मतदारसंघात दिसून येते. शासनाच्या विविध योजना राबवून जिल्ह्यासोबत तिवसा तालुक्यात यशोमतींनी केलेला विकास सर्वश्रुत आहे. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला आपण पुढे नेले पाहिजे, अशी मतदारांची भावना आहे.