विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आता महाविकास आघाडीचे दिग्गज देखील मैदानात उतरले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी राहात्यामध्ये शिर्डी मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर वक्तव्य केलंय. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हातामध्ये राज्याचे अधिकार द्यायले हवे, असं वक्तव्य काल शरद पवार यांनी राहात्यामध्ये केलंय.
भरसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांना आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. त्यांच्या हातामध्ये राज्य दिलं, तर शेतीपासून अनेक प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Assembly Election 2024) आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? यावरून बरीच चर्चा सुरू होती. आता शरद पवार यांनी सभेत बोलताना बाळासाहेब थोरात यांचं कौतुक केलंय, त्यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कात सभा;वाहतुकीत मोठे बदल
शिर्डी मतदारसंघामधील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार राहात्यामध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. यावेळी पवार भाषणात म्हणाले की, तरुणांच्या रोजगाराची समस्या मोठी आहे. शेतीशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आता बाळासाहेब थोरात यांना आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी विधानसभेत जाणार नाही, तिथे बाळासाहेब थोरात आहेत. राज्याचे कृषिमंत्री म्हणून देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेत थोरातांनी सर्वोत्तम काम केलंय. हे आपण पाहिलंय. थोरात यांना सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव असल्याचं देखील पवार म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, माझ्या आणि प्रभावती घोगरे यांच्या भाषणावर लवकरच बंदी येणार असल्याची शक्यता आहे. यासंबंधी काही हालचाली निवडणूक आयोगाकडे सुरू आहेत, असं देखील थोरात म्हणाले आहेत. या भागामध्ये गुलामीचं राजकारण सुरू आहे, असा आरोप देखील बाळासाहेब थोरात यांनी केलाय.