7.7 C
New York

Rahul Gandhi : महालक्ष्मी योजनेबाबत राहुल गांधींचे महत्वाचे वक्तव्य …

Published:

महाविकास आघाडी आणि महायुतीत महाराष्ट्रातील निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यासाठी २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात आला आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आता नंदुरबारमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक घोषणा केल्या. महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे राहुल गांधी म्हणाले,महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला खटाखट तीन हजार रुपये मिळणार आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला बसमध्ये तिकीट मोफत असणार आहे. तुम्ही तिकीट न काढता बँकेत किंवा राज्यभरात कुठेही जाऊ शकणार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

Rahul Gandhi भारत सरकारमध्ये आदिवासी अधिकारी नाही…

भारत सरकार ९० अधिकारी चालवतात. परंतु त्यामध्ये केवळ एक व्यक्ती आदिवासी आहे. त्या अधिकाऱ्यास मागे बसवले आहे. त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याला आदिवासी असल्यामुळे काम दिले जात नाही. शंभर रुपये भारत सरकार खर्च करत असेल तर दहा पैसे आदिवासी अधिकारी खर्च करण्याचा निर्णय घेतात. आदिवासी देशात आठ टक्के आहे. परंतु त्यांची भागेदारी नाही. माध्यमांमध्ये, तसेच आदाणी, अंबानी यांच्या कंपनीत एक अधिकारी मिळणार नाही. परंतु मजुरांची यादी केली तर त्यामध्ये आदिवासी मिळतात.

हरियाणात भाजपच्या विकासाची पोल-खोल!

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना 4 हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे. सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात 25 लाखापर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img