7.7 C
New York

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कात सभा;वाहतुकीत मोठे बदल

Published:

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिवसेंदिवस प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. पुण्यातील सभेनंतर आता मुंबईतील ऐतिहासिक असलेल्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी होणारी गर्दी पाहता वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रचार सभांना जोरदार वेग आला आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणुक चांगलीच रंगणार असल्याचं दिसत आहे.

आज सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कावर सभा होणार आहे. त्यामुळे सकाळ पासून रात्री १२ वाजेपर्यंत दादर आणि आसपासच्या परिसरातील मार्गावरील होणारी वाहतूक ही बंद केली जाणार आहे.दरवर्षी दिवाळीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे आकर्षित रोषणाई करण्यात येते मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असल्याने शिवाजी पार्क येथील ही रोषणाई काढून टाकण्यात आली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा होणार आहेत. सुरुवातील छत्रपती संभाजीनगर मधील चिखलठाण्यातील एमआयडीसीत सभा होणार आहे तर दुपारी ४ वाजता खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यानंतर सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्कावर मोदींची तोफ धडाडणार आहे. याच पार्श्वभूमीवर कडोकोट बंदोबस्त सह पोलिस सुरक्षा ही तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोण कोणत्या मार्गावर पार्किंगसाठी मुंबई पोलिस वाहतुक शाखेकडून करण्यात आली आहे. हे पाहुयात.

सांगता सभेत पवारांवर जोरदार पलटवार करणार; वळसे पाटलांनीही दंड थोपटले

PM Narendra Modi कोणत्या मार्गावर सक्तीची मनाई ?

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ते डॉक्टर बाबासाहेब वरळीकर चौक , माहिम,केळुस्कर रोड उत्तपर आणि दक्षिण मार्ग, दादर येथील एम.बी.राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क गेट क्रमांक ४ ते शितलादेवी, गडकरी जंक्शन ते शोभा हॉटेल दादर, हनुमान मंदिर जंक्शन एनसी केळकर मार्ग ते गडकरी जंक्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, टिळक मार्ग, खान अब्दुल गफरखान रोड, बिंदु माधव ठाकरे चौक, डॉ.अॅनी बॅसंट रोड या मार्गांवर वाहनं उभी करण्यास सक्तीची मनाई करण्यात आली असून सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँक जंक्शनपर्यंत आणि त्याचबरोबर पोर्तुगीज चर्च या रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई वाहतुक पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांमुळे सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img