5.3 C
New York

Dombivali : डोंबिवलीमध्ये राजकारण तापलं, ऑफिस फोडून, मारहाण…

Published:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. आरोप-प्रत्यारोप नेत्यांकडून परस्परांवर जोरदार सुरु आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काही मतदारसंघात धक्काबुक्की, हाणामारी झाल्याचा बातम्या येत आहेत. भाजपा कार्यालयाची आता डोंबिवलीत (Dombivali) तोडफोड करण्यात आल्याच वृत्त आहे.

डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. जुगल उपाध्याय डोंबिवली पश्चिमेतील गृजराती सेलचे पदाधिकारी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तीन ते चार अज्ञात व्यक्ती अचानक तिथे धडकले. त्यांनी शिवीगाळ केली. मारहाण करून तोडफोड केली. कॅबिनेट मंत्री भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात डोंबिवली विधानसभेत थेट लढत आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सांगता सभेत पवारांवर जोरदार पलटवार करणार; वळसे पाटलांनीही दंड थोपटले

मागच्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापलं होतं. या तोडफोडीच खापर भाजपामधील सुत्रांनी विरोधकांवर फोडलं आहे. डोंबवलीत मागच्या तीन टर्मपासून रविंद्र चव्हाण आमदार आहेत. 2009 पासून ते सातत्याने डोंबिवलीमधून विधानसभेची निवडणूक जिंकत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img