7.7 C
New York

Pankaja Munde : ‘त्या’ गोष्टीवरून पंकजा मुंडेंचा युटर्न? म्हणाल्या….

Published:

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे.भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश हा करण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणा दिल्या जात असल्याचं दिसून येत आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेच्या विरोधात भूमिका घेतली होती. आम्ही शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार मानतो, त्यामुळे अशा घोषणाला काहीही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

अजित पवार यांच्यानंतर आता भाजपनेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी देखील या घोषणेबाबत रोख-ठोक वक्तव्य केलं . एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. माझं राजकारण खर सांगायचं झालं तर वेगळं आहे. या घोषणेचं समर्थन मी भाजपची आहे म्हणून करणार नाही. विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे. सर्व नागरिकांना सोबत घेऊन नेत्यानं काम करणं अपेक्षीत आहे, त्यामुळे असा कोणताही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कात सभा;वाहतुकीत मोठे बदल

या विषयावर थेट बोलणं मात्र आता त्यांनी टाळलं आहे. पंकजा मुंडे यावर बोलताना म्हणाल्या की, ऑन इयर मी कुठे बोलले आहे का? ते फक्त प्रिंटलाच आलं आहे. मी लवकरच यावर बोलेल, पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

Pankaja Munde अजित पवारांकडूनही नाराजी

दरम्यान दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी देखील या घोषणेवरून नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार मानतो, त्यामुळे अशा घोषणाला काहीही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या घोषणेवरून विरोधक देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img