तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) हे उमेदवार आहेत. राणा पाटलांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. आज नळदुर्गमध्ये राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, ही खऱ्या अर्थाने जनतेच्या भविष्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे.
गडकरी म्हणाले की, शेती आणि उद्योग व्यापार या दोन्ही क्षेत्रांमध्ये विकास करायचा असेल तर चार गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन. देश आत्मनिर्भर झाला (Assembly Election 2024) पाहिजे. जशी स्मार्ट शहरे झाली तशी स्मार्ट खेडी देखील झाली पाहिजे. पहिल्यांदा रस्त्याचा विकास झाला पाहिजे. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी सहा हजार कोटी मी माझ्या विभागातून विकासासाठी दिलेली आहेत. 24 कामं पूर्ण झाली आहेत, 13 कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
राहुलला एक संधी द्या, शरद पवारांची चिंचवडकरांना भावनीक साद
तुळजापूर आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या विकासासाठी दोन हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय. यामुळे हे मोठं तिर्थक्षेत्र होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या भागात रोजगार निर्माण झाला पाहिजे. नळदुर्ग ते तुळजापूर हा रस्ता मंजूर झालाय. कोणावरही अन्याय नाही. जात, पंथ आणि लिंग याआधारे कोणालाही अपात्र ठरवणार नाही, असं गडकरी म्हणाले आहेत. आज भविष्य ज्ञानाशी संबंधित आहेत.
कुठल्याही जातीवादावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नितीन गडकरी यांनी भरसभेत केलंय. जातीकरता मातीकरता का खायची? जातीच्या आधारे मागासलेपण असेल तर नक्कीच सवलत मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. निवडणुकीत जात कशाला? असा सवाल गडकरींनी केलंय. निवडणुकीत जो रस्ते बनवेल, शेताला पाणी देईल, रोजगार देईल, त्याच्यापाठीमागे उभे राहा. राणा जगजितसिंह पाटील यांना मत द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, असं आवाहन नितीन गडकरींनी केलंय.