8.3 C
New York

Uddhav Thackeray : माझी बॅग ऑटो चेंकिंग मोडवर टाकली, आता मोदींचीही बॅग तपासा…; उद्धव ठाकरे कडाडले

Published:

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) श्रीगोंद्यात सभा झाली. या सभेपूर्वी हेलिपॅडवर त्यांची बॅग तपासण्यात आली. यावरून त्यांनी निवडणूक आयोगावर आणि पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Modi) जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाने आपली बॅग ऑटो चेकिंग मोडवर टाकली, माझी बॅग तपासली, मला त्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. मात्र, सर्वांना समान न्याय हवा, मोदींचीही बॅग तपासली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी आज श्रींगोद्यात सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, आजही माझ्या सामानाची तपासणी करण्यात आली. यावरून माझी बॅग चेक करण्याचा कार्यक्रम ऑटो चेकिंग मोडवर टाकल्याचं दिसतं. माझे सामान तपासायला माझी हरकत नाही. पण मी मुद्दाम या घटनांचे व्हिडिओ मुद्दाम सार्वजनिक करत आहे. यातून माझी फोटोग्राफीची हौस भागत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या बॅग तपासल्याचे व्हिडिओ देशभरात पोहोचल्यानंतर इतर लोकांच्या बॅग तपासण्येच व्हिडिओ आले. निवडणूक आयोगानेही यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात ते म्हणाले की, कायदा पंतप्रधान वगळता सर्वांना लागू आहे. माझा त्यावरच आक्षेप आहे. पंतप्रधानांपासून सर्वांपर्यंत यासंबंधीच्या नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray जनता तु्म्हाला संपवणार…

उद्धव ठाकरेंना संपवायला सगळेच निघाले. तुम्ही देशाच्या शत्रूंना संपवा. उद्धव ठाकरेंना काय संपवता. मी पाप केलं नसेल आणि मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तर जनता माझ्यासोबत राहून तु्म्हाला संपवेल, असा इशााही ठाकरेंनी दिला.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बूस्ट; तानाजी सावंतांनी पक्षात आणली तरुणांची फळी

Uddhav Thackeray अपक्ष लढणारे गद्दारीच करताहेत…

यावेळी त्यांना राहुल जगताप यांच्यावरही टीका केली. काही जण बंडखोरी करून आपली मतं फोडण्याचा प्रयत्न करतात. जे अपक्ष लढत आहेत, ते गद्दारीचं करत आहेत. आपण स्वाभिमानाने महाराष्ट्र उभा करतोय, त्याला तुम्ही अपशकुन करता, कुठं फेडाल हे पाप? असा हल्लाबोल ठाकेरंनी केला. इथल्या प्रत्येकाने आणि शिवसैनिकांनी भेदभाव न करता अनुराधा नागवडेंचा प्रचार केला पाहिजे, असं ठाकरे म्हणाले. आज सोयाबीनला भाव नाही, कापलासाला भाव नाही. सत्ताधाऱ्यांनी राज्य वाऱ्यावर सोडलं. पण, आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray मोदी-शाह हे ठग

मोदी शाह हे ठग आहेत. शाहांनी केंद्रात वेगळं खात तयार केलं. सहकार खात आता शाहांच्या बुडाखाली आहे. म्हणजे, मेहनत तुम्ही करणार, आणि तुमच्या सारखेला अमित शाहांच्या मुंग्या लागणार, असंही ठाकरे म्हणाले. साखर कारखाने आणि सहकारी बॅंका अदानींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे, असं ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray तुझा हात जाग्यावर ठेवणार नाही…

धनंजय महाडिक यांचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. महाडिक, महिलांचा फोटो काढणं हा गुन्हा आहे. तुला मी इथल्या महिलांचे फोटो पाठवतो. एकीच्या केसालाही हात लागला तर तुझा हात जाग्यावर ठेवणार नाही, असं ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img