6.3 C
New York

BJP : ‘बटोगे तो कटोगे’ नाऱ्यावर भाजपमधील नेते नाराज

Published:

उत्तर प्रदेशमधील ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ च्या घोषणा हरियाणाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देताना पाहायला मिळत (BJP) आहे. मात्र, महायुतीतीत घटकपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अशा घोषणा महाराष्ट्रात चालणार नाहीत, असं म्हटलं आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’वर पंकजा मुंडे यांनीही वेगळी भूमिका मांडली आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेकडे मी संघाच्या हिंदुत्त्वाच्या व्याख्येतून बघतो. ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी आहे. भारतीयत्त्वाशी जोडणारी आहे,” असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ‘एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “निवडणुकीच्या काळात प्रत्येकाच्या प्रचाराची एक पद्धत असते. त्यातून या घोषणा दिल्या जात असाव्यात. मी मात्र याकडे संघाच्या हिंदुत्त्वाच्या व्याख्येतून पाहतो. ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणार आहे. भारतीयत्त्वाशी जोडणारी आहे. यात जात, धर्म, पंथ भेदाला स्थान नाही.”

“अलीकडे आपल्याला शेजारी राष्ट्रांकडून धोका वाढला आहे. पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात, हल्ले करतात. बांगलादेशचे घुसखोर येतात. या सर्वांपासून सावध राहण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी एक होणे गरजेचे आहे. कदाचित त्यातून ही घोषणा जन्माला आली असावी. मी सुद्धा याच दृष्टीकोणातून बघतो,” असं गडकरींनी म्हटलं आहे

पंतप्रधान मोदींचे सरकार पडणार,मविआतील नेत्याचे वक्तव्य

BJP हे महाराष्ट्रात चालणार नाही…

“‘बटेंगे तो कटेंगे’ महाराष्ट्रात चालणार नाही. ते तिकडे उत्तरेकडे चालवायचं. हा महाराष्ट्र शाहू, फुलेंचा आहे,” अजितदादांनी असा शब्दांत बीडमधील महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

BJP मी समर्थन करणार नाही…

भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, “‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणांजी राज्यात गरज नाही. त्याऐवजी विकासावर बोलायला पाहिजे. मी भाजपत आहे, म्हणून ‘बटेंगे तो कटेंगे ’, घोषणेचं समर्थन करणार नाही.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img