6.3 C
New York

Latest Updates : ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

Published:

जोगेश्वरी राडा प्रकरण: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला अटक

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब बाहेर राडा आणि त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

खासदार रवींद्र वायकर यांच्या चार महिला कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मातोश्री क्लब बाहेर राडा मध्ये विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये चार शिवसैनिकांचा विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणांमध्ये एमआयडीसी पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसैनिक विलास जाधव याला अटक केली आहे.

 भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यलयात हल्ला

कल्याणध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यलयात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुगल उपाध्याय भाजपचे सोशल मीडिया संयोजक आहेत. उपाध्याय यांच्या कार्यलयात येऊन दोघांनी मारहाण करत केली तोफफोड झाली.

 विधानसभेसाठीचा मनसेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

विधानसभेसाठीचा मनसेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या प्रसिद्ध होणार आहे.\

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भाजपचे नेते आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन झालय. गेल्या अनेक वर्षांपासून हरिश्चंद्र चव्हाण दुर्धर आजार अशी लढत होते.

तांत्रिक बिघाडाने मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत
सर्वसामान्यांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमुळे आज सकाळीच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या वाहतुकी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरील गाड्या या उशिराने धावत आहेत. सकाळी कामाला जाण्याची वेळ असल्याने रेल्वेच्या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले

काल उद्धव ठाकरे यांनीही अधिकाऱ्यांची उलटतपासणी घेतली. उद्धव ठाकरे हेलिपॅडवर उतरल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना बॅग तपासायची असल्याचे सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. आय-कार्ड पाहिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे नियुक्तीपत्राची मागणी केली.

एकनाथ शिंदे यांनी राजकारणात कोणते धाडस दाखवले

ईडी, सीबीआयच्या भीतीने एकनाथ शिंदे आणि हे सर्वजण पळून गेले आहेत. यातील निम्मे लोक तुरुंगात जाणार होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे या सर्वांची यादी आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांची नावे असल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी राजकारणात कोणते धाडस दाखवले ते त्यांनी सांगावे. त्यांनी जे काही केले आहे ते सर्व पैशाच्या जोरावर केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img