5.5 C
New York

Chhagan Bhujbal : ‘शरद पवारांनीच आम्हाला मुख्यमंत्रीही केलं नाही’, छगन भुजबळांचं रोखठोक उत्तर

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल येवल्यातील सभेत छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. छगन भुजबळांनी आपली फसवणूक केली. एखाद्या माणसानं किती चुकीची कामं करावीत, किती फसवणूक करावी याला काही मर्यादा असतात. पण, या मर्यादा भुजबळ यांनी ठेवल्या नाहीत, अशा शब्दांत भुजबळांचा समाचार घेतला होता. आता छगन भुजबळ यांनीही शरद पवारांना जशास तसं उत्तर दिलं आहे. खरंतर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनीच केलं, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

Chhagan Bhujbal काय म्हणाले होते शरद पवार?

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल येवल्यासह पाच मतदारसंघात सभा घेतल्या. यातील चार मतदारसंघात विरोधी उमेदवार अजित पवार गटाचे आहेत. तेव्हा शरद पवारांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला चढवला. पवार म्हणाले, एखाद्याने चुकीचे काम, फसवेगिरी किती करावी याला काही मर्यादा असतात. आता या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या असून अशा धोकेबाजाला निवडणुकीत घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे.

नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा; वळसे पाटलांसाठी झिरवळांची साद

अशाच चुकीच्या उद्योगांमुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं. तरीही अडचणीच्या काळात मी त्यांना आधार दिला. कारागृहात त्यांनी कुणी भेटायलाही तयार नव्हतं. त्यांच्या सर्व चुका विसरून त्यांना सहकार्य केलं. पण आता पक्षाला फसविणाऱ्यास येवलेकरांनी धडा शिकवावा असे आवाहन शरद पवार यांनी आपल्या भाषणातून केलं.

Chhagan Bhujbal काय म्हणाले छगन भुजबळ?

सन १९९१ मध्ये शरद पवार यांनीच शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म केलं. मी एकटा शिवसेना फोडू शकत नव्हतो. ३६ लोकांच्या सह्या झाल्यानंतर मी शेवटी गेलो. शरद पवारांनी अगदी जाणीवपूर्वक मला, अजित पवारांना आणि आर. आर. पाटलांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर नेता वरचढ होऊ शकतो याचा अनुभव पाठिशी असल्याने २००४ मध्ये मलाच काय तर अजित पवार आणि आर आर पाटील यांनाही मुख्यमंत्री केलं नाही.

यानंतर छगन भुजबळांनी तेलगी प्रकरणावरही भाष्य केलं. काहीच दोष नसताना विनाकारण मला या प्रकरणात गोवण्यात आलं. अधिकाऱ्यांतला वाद असताना मला राजीनामा द्यायला लावला अशी खंत छगन भुजबळ यांनी पुन्हा बोलून दाखवली. राजकारणात काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला काही विचारधारा तरी आहे पण, राष्ट्रवादीला काय विचारधारा आहे असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी विचारला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img