12.9 C
New York

Otur : पोलीसांच्या वतीने सराफ व्यावसायिकांना सुरक्षेसाठी सूचना

Published:

ओतूर (प्रतिनिधी ) दि.१३ नोव्हेंबर ( रमेश तांबे )

अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील साकूर मांडवे येथे सोन्याच्या दुकानावर भरदिवसा पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि.१२ रोजी ओतूरमधील सराफ व्यापाऱ्यांची ओतूर पोलीस ठाण्यात मिटींग घेण्यात आली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली.

अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 


यावेळी या सोने चांदीच्या व्यापाऱ्यांना दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सिक्युरिटी गार्ड नेमावा, दुकानापुढे ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग होऊन वाहतूक अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. अलार्म बसवावा व इतर सुरक्षेच्यादृष्टीने योग्य त्या सूचना त्यांना देण्यात आल्या तसेच याबाबत सराफ व्यावसायिकांना नोटीस देखील देण्यात आली असल्याचे श्री थाटे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img