3.3 C
New York

Supreme Court : ‘शरद पवारांचे फोटो वापरु नका’ अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाचे आदेश

Published:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर निकाल लगेचच दोन दिवसांनी जाहीर होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार गटाला मोठा झटका दिला आहे. ‘स्वतंत्र पक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत लढा’, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले होते. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पक्ष आणि चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश पाळले जात नसल्याचा आरोपही शरद पवार गटाने केला होता. या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात आली होती. अजित पवार गटाला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत ३६ तासात वृत्तपत्रात जाहिरात द्या असे आदेश दिले होते. यानतंर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

Supreme Court अजित पवार गटाने स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढावी

नुकत्याच झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अजित पवार गटाने स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढावी. एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा. तसेच तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ वापरू नका, असा सूचना करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. सगळ्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहा, असेही कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले आहे.

अजित पवार गट आणि शरद पवार गटाने निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. वारंवार शरद पवारांच्या फोटोचा अजित पवारांकडून वापर केला जातो, अशी तक्रार शरद पवारांच्या वकिलाने केली आहे. याप्रकरणी बोलताना कोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं. दरवेळी मतदारांवर व्हिडीओ वगैरेचा प्रभाव पडेलच असे नाही, कधी कधी तो प्रभाव पडतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img