-7.4 C
New York

Otur : अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 

Published:


ओतूर,प्रतिनिधीदि.१३ नोव्हेंबर ( रमेश तांबे )

अवैध दारू वाहतूक प्रकरणी ओतूर (Otur) पोलिसांनी गुलाम करीम शेख (वय ४० रा. फांगुळशी, पोस्ट तळेगाव, ता. मुरबाड, जि.ठाणे) व सुनील पोकळा (रा. चिंचवाडी, ता. मुरबाड, जि. ठाणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात वापरलेली बलेरो गाडी व २४ हजार रूपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू असा एकूण दोन लाख ७४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली. 

गुलाम करीम शेख, वय ४० वर्षे, राहणार- फांगुळशी, पोस्ट तळेगाव, ता.मुरबाड, जि.ठाणे व पळून गेलेला  सुनील पोकळा, रा. चिंचवाडी, ता.मुरबाड, जि.ठाणे अशी आरोपींची नावे असून दोन्ही आरोपींच्या विरोधात ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना श्री थाटे हे म्हणाले की, सध्या राज्यात विधानसभा निवडणुका सुरू असून आचारसंहिता सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुबी या ठिकाणी कल्याण-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर स्थिर निगराणी पथकाद्वारे २४ तास नाकाबंदी सुरू आहे. मंगळवार दि.१२ रोजी  पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी चालू असताना कल्याण बाजूकडून अहिल्यानगरकडे जाणारी राखाडी रंगाची बोलेरो क्र. एम.एच. १६ ए. बी.०४६७ ही गाडी संशयित वाटल्याने सदर गाडीची ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप मनोज कोकणी, आशिष जगताप तसेच स्थिर निगराणी पथकानी कसून तपासणी केली असता या गाडीमध्ये पांढऱ्या रंगाच्या दहा पिशव्यांमधील गाडीच्या ट्यूबमध्ये गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. यावेळी बोलेरो गाडी चालक गुलाम करीम शेख याच्याकडे अधिक चौकशी केली असता सुनील पोकळा याचे मालकीचा हा मुद्देमाल असून बोलेरो गाडीमधून वाहतूक करून घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले. या प्रकरणी बलेरो चालक गुलाम करीम शेख व कारवाई दरम्यान पळून गेलेला सुनील पोकळा या आरोपी विरोधात ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आशिष कांतीलाल जगताप यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून ओतूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ ) ( ई ), ८३ प्रमाणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.लहू थाटे, पोलीस अंमलदार मनोज कोकणी, आशिष जगताप, संदीप भोते, राजेंद्र आमले, पो.हवा. नामदेव बांबळे, पो. हवा. संदीप लांडे, तसेच एसएसटी पथकातील संतोष गोविंद मेने, दत्तात्रय ज्ञानदेव मडके, कासिम रजाक अत्तार यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img