8.3 C
New York

Raj Thackeray : “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान…; राज ठाकरेंची बोचरी टीका

Published:

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्यासभा वाढल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान कर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होताना दिसणार आहे. मनसे पक्ष देखील यंदाच्या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोशी मतदारसंघामध्ये राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे. तसेच पक्षाचे नाव व चिन्ह गेल्यामुळे टोला देखील लगावला आहे. तसेच राज ठाकरे म्हणाले निवडणुकींच्या प्रचारसभांचा कंटाळा आला असल्याचे देखील आहेत. निवडणूक सभांचा प्रचार करणं कंटाळवाणं असतं. आता टीव्हीवर लाइव्हही दाखवतात. तेच तेच बोलावं लागतं. किती गोष्टी तुम्ही ऐकल्या मला माहीत नाही. पण तेच तेच विषय बोलावे लागतात, असे मत राज ठाकरे यांनी वक्त केले.

विरोधी उमेदवारांकडे 20 ते 25 कोटी पोहोचले; संजय राऊतांचा गंभीर आरोप

वर्षांतला सगळा गोंधळ तुम्ही पाहिला आहे ना. काय गोष्टी घडल्या? कोण कुणाबरोबर गेलं? तुम्हाला माहीत आहे. कुठपर्यंत गेलं प्रकरण? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ती आज एकनाथ शिंदेंकडे गेली. निवडणूक चिन्हासकट ती गेली. मला अजूनही आठवतंय मराठवाड्यात एक घोषणा होती. बाण हवा की खान? दुर्दैव असं की उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय. उरलेत फक्त खान. वर्सोव्यात उमेदवार कोण दिलाय? हारुन खान. हा शिवसेनेचा उमेदवार आहे.

पुढे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “इथपर्यंत तुमची वेळ गेली? कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत. उबाठा शिवसेनेचे उमेदवार उर्दूत पत्रक काढत आहेत. कुठपर्यंत मजल गेली आहे बघा. मी मनसेच्या जाहिराती दिल्या मध्यंतरी वर्तमान पत्रांमध्ये. त्या तुम्ही कदाचित पाहिल्या असतील. इंग्रजीत इंग्रजी वर्तमानपत्र आहे म्हणूनजाहिरात नाही दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img