भूम-परांडा-वाशी या भागातील शेतकर्यांनी त्यांचा ऊस पार आटपाडीपर्यंत नेला. कारखान्यांअभावी अनेकांनी शेतावर ऊस तोडून टाकला. आपण शेतकर्यांसाठी साखर कारखाने सुरू केले. ‘तेरणा’ सुरू केला, ‘शिवशक्ती’ सुरू केला, ‘नरसिंह’ चार महिन्यांत सुरू होईल, आम्ही चुली पेटवतो. घरं नाही. मी पाऊल ठेवले की विकास होतो. माजी आमदारानं पाऊल ठेवलं की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी विरोधकांवर बरसले. जिल्ह्यातील पारा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत सावंत यांनी मतदारांसमोर विकासाचं नव व्हिजन मांडलं.
सावंत पुढे म्हणाले, मी नेहमीच विकासाच्या राजकारणाला महत्व देत आलोय. मी तर अशी विनंती करतो की विरोधकांनी सुद्धा येथे यावं ऐकावं आणि घरी जाऊन त्यावर चिंतन करावं. मग त्यांच्या लक्षात येईल की ३५ वर्षांतील विकास काय होता आणि माझ्या मंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षांतील विकास काय आहे. मागीलवेळी ‘उजनी’च्या पाण्याचा मुद्दा घेऊन निवडणूक लढलो आणि जिंकलो.
निवडणुकीनंतर तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुखांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला छेद दिला. त्याला पहिला विरोध तानाजी सावंतनेच केला. कारण, ते मला रूचलं, पचलं नाही. पहिलं बंडाचं निशाण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धाराशीव जिल्ह्यात फडकलं. त्यानंतर उठाव केला आणि राज्यामध्ये सत्ता बदल घडवून आणला.
शिवसेना शिंदे सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी १२ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. ‘उजनी’चे पाणी आपल्या सीना कोळेगाव धरणात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या गुढी पाडव्याला हे पाणी आपणास मिळणार आहे. सीना कोळेगावमधून हे पाणी भूम व वाशी तालुक्यांत येणार आहे. ‘उजनी’तून मतदारसंघात आणलेल्या या पाण्याचा फायदा तीनही तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे मी दिलेले वचन पूर्ण होत आहे. विरोधकांनी ३५ वर्षे या भागाला विकासापासून वंचित ठेवले.
“उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान…; राज ठाकरेंची बोचरी टीका
कारखान्यांअभावी येथील शेतकर्यांना त्यांचा ऊस पार आटपाडीपर्यंत न्यावा लागला. काहींनी कारखान्याअभावी बांधावर ऊस तोडून टाकला. आम्ही त्यासाठी जिल्ह्यांत कारखाने सुरू केले. त्यांनी तेरणा कारखाना १५ वर्षे बंद पाडला. दोघांच्या वादात शेतकर्यांचे नुकसान झाले. २०२३ ला तेरणा सुरू केला. वाशीचा शिवशक्ती सुरू केला आहे. नरसिंह पुढील चार महिन्यांत सुरू होईल, मी पाऊल ठेवले की विकास होतो. माजी आमदाराने पाऊल ठेवले की दुष्काळ पडतो, अशी खोचक टीका तानाजी सावंत यांनी केली.
आता आपल्याला दूध संघाचे पुनर्निर्माण करायचं आहे, सांगाल तो भाव दुधाला मिळेल, कारण दूध संघ तुमचाच असणार आहे. सोयाबीनपासून तेलनिर्मितीच्या तीन फॅक्टर्या निर्माण करायच्या आहेत. त्यामुळे या पुढे फक्त विकासाला मतदान करा, नात्यागोत्याच्या राजकारणाला बळी पडू नका. आजपर्यंत सोयरेधायरे बघून मतदान केले तर ३५ वर्षे मागास राहिलो, अशा शब्दांत प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सभेच्या सुरूवातीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख सूर्यकांत सोडसे, प्रा.किशोर पानसे, बाळासाहेब हडोंग्रीकर, भाजपचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे आदींनी आपले विचार व्यक्त करत विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख सूर्यकांत सोडसे, प्रा. किशोर पानसे, बाळासाहेब हडोग्रीकर, भाजपचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, भैरवनाथ शुगर वर्क्स वाशीचे केशव सावंत, जिल्हा युवासेना प्रमुख बाळासाहेब मांगले, शिवसेना तालुका प्रमुख अॅड. सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, गटनेते नागनाथ नाईकवाडे, बंडू खोसे, विकास तळेकर.
शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पूजाताई उकिरडे, बिभीषण खामकर, नितीन रणदिवे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता तोडकर, सर्कल प्रमुख राजाभाऊ सुकाळे, गटप्रमुख सुनील मोरे, श्रीमंत शिंदे, शाखाप्रमुख सोमनाथ शिंदे, चेअरमन सुदर्शन शिंदे, सुरेश वाकचौरे, सरपंच राजेंद्र काशीद, उपसरपंच अतुल चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू मुरकुटे, चेअरमन विश्वंभर भराटे, पिंपळवाडीचे सरपंच सुनील उंदरे, मंडवाचे सरपंच नितीन रणदिवे, दश्मीगावचे सरपंच पोपट मोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.