9.3 C
New York

Nitin Gadkari : भाजपमधील वाढत्या पिकावर फवारणी करण्याची गरज; नितीन गडकरींचा रोख नक्की कुणाकडं?

Published:

सध्या राज्यात विधानसभांचं वार जोरात सुरू आहे. त्यामध्ये सर्वच पक्षाचे नेते मुलाखती, भाषण, असं बरच काही करत आहेत. या ना त्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहेत. (Nitin Gadkari ) साथ आपल्या पक्षाला देण्याचं आवाहन ते करत आहेत. परंतु, यामध्ये चर्चा होते ती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची. गडकरी हे नेहमी रोकठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. तशाच आपल्या रोकठोक भाषेत त्यांनी वक्तव्य केलं आहे.

ज्याप्रमाणे पिक जोमाने आल्यानंतर त्यावर रोगराई पसरते. अशावेळी फवारणी करून रोगराईचा नायनाट करावा लागतो. त्याप्रमाणे आता भाजपा पक्षात कार्यकर्त्यांचा भरपूर ओघ येत आहे. त्यात चांगले दाणे आहेत, त्याप्रमाणे रोगराईदेखील आहे. त्याच्यावर फवारणी करायला लागते. ते काम आम्ही करत आहोत असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी मुलाखतीत बोलत होते.

“..अन् आता तेच मला रिटायर करायला निघालेत”; दाखला देत अजितदादांचं शरद पवारांना उत्तर

केडरबेस संघटना भारतीय जनता पार्टी ही असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत. नवनवीन लोक पक्षात येत असतात. त्या कार्यकर्त्यांना विचारधारा समजावून सांगणं, प्रशिक्षण देणं, कार्यकर्त्याला घडवणं ही आमची जबाबदारी आहे. हजारो कार्यकर्ते घडवल्यानंतर ते फिल्डवर काम करत असतात. पण एखादा कार्यकर्ता असं काही बोलतो की हजार कार्यकर्त्यांच्या कामावर पाणी सोडलं जातं. त्यामुळे कार्यकर्त्याला घडवण्याची प्रक्रिया आमच्या पक्षात नित्य सुरू असते असंही ते यावेळी म्हणाले.

देशात आज विचारभिन्नता अडचण नाही तर विचारशून्यता ही अडचण आहे. जे लोक राजकारणात आज काम करतात, त्यांना स्वतःविषयी चिंता असते. माझं काय होईल? मला तिकीट मिळणार का? मला सत्ता द्या, हा मी वरचढ होऊ लागला आहे. समाजाची चिंता असलेला कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे, अशी परखड भावनाही नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img