8.3 C
New York

Devendra Fadnavis : नरीमन पॉईंट ते विरार प्रवास होणार आता सुसाट, फडणवीस यांची मोठी घोषणा

Published:

मुंबई आणि नवी मुंबई रस्ते मार्गाने प्रवास करणे मोठे दिव्यच असते. दीड ते दोन तासांचा वेळ सध्या या प्रवासासाठी जातो. परंतु राज्यात समृद्धी महामार्ग साकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन भागांना जलदगतीने मार्गाने जोडण्याचा प्लॅन सांगितला.केवळ ४० मिनिटांत नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने होणार असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी नवी मुंबईतील प्रचार सभेत बोलताना सांगितले. ‘कोस्टल रोड’ चा विस्तार भयंदर, विरार पालघरपर्यंत करण्यात येणार आहे. जपान सरकार त्यासाठी 40 हजार कोटी कर्ज देणार आहे, असे फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी मंगळवारी सांगितले.

Devendra Fadnavis काय म्हणाले फडणवीस

४० मिनिटांत नरीमन पॉईंट ते विरार प्रवास करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु होत आहे. त्यासाठी ५४ हजार कोटी जपान सरकारकडून मिळणार आहेत. तसेच नवी मुंबईत वाढवण बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे. नवीन रस्ते होत आहे. या भागाचे चित्र आता या ठिकाणी विमानतळ आले तर बदलणार आहे. या विमानतळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे जाहीर केले. या ठिकाणी होणाऱ्या वाढवण बंदरामुळे कोळी बंधू समृद्ध होतील. नरेंद्र मोदी यांनी निल क्रांती योजना आणली. त्यामुळे कोळी बांधवांना कर्ज मिळू लागले. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात बदल होऊ लागले, असे फडणवीस यांनी सांगितले.

निलंग्याला काम करणारा प्रामाणिक नेता मिळालाय; संभाजी पाटलांना साथ द्या -नितीन गडकरी

मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतीचा दर्जा दिला. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यावर 15 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच शेती पंपासाठी बिल भरायची गरज राहणार नाही. त्यांचे वीज बिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार आहे. तसेच पूर्ण कर्ज माफी करू आपले सरकार आल्यावर, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार

पैशांमुळे किती हुशार मुलगी असली तरी शिकवले गेले नाही. मंत्रालयातील त्यांचा मामा मात्र आता त्यांच्या शिक्षणाचा खर्च करतील. अर्ध्या दरात महिलांना बसमधून प्रवास करण्याची सवलत दिली. त्यामुळे तोट्यातील एसटी नफ्यात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. त्यावेळी काँग्रेससह अनेकांनी आम्हाला वेड्यात काढले. अडीच कोटी महिलांना परंतु त्यांच्या नाकावर टिच्चून लाभ दिला. परंतु तुमची योजना हे सावत्र भाऊ बंद करू पाहत आहेत. या योजने विरोधात ते कोर्टात गेले आहे. लाडक्या बहीण योजनेची रक्कम वाढवून सरकार आता 2100 रुपये करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img