राज्यातील विधानसभा निवडणुकांचा अवघा एक आठवडा शिल्लक राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज पुण्यात सभा होणार आहे. पुणे शहर, जिल्हा व सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (मंगळवार) पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होत आहे.महायुतीकडून पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात येणार आहे. पण दुसरीकडे मोदींच्या सभेमुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी भागाती ना.सी. फडके चौक ते नाथ पै चौक हा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी रस्त्यांचा वापर कऱण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय टिळक आयुर्वेद महाविद्यालय, बाबुराव घुले पथ, आंबील ओढा परिसरातील रस्त्यावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. साने गुरुजी रस्ता परिसरातील टिळक रोड ते निलायम चित्रपटगृह या मार्गावरील पार्किंग व्यवस्थाही आज बंद ठेवली जाणार आहे. याशिवाय टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतुकासाठी सुरू राहणार आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांनीही नुकताच पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. पुणे पोलील आमि केंद्रीय सुरक्षा दलाकडे या दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणूक भयमुक्त होऊ द्या; अन्यथा मस्ती जिरवण्याचं काम करू, प्राजक्त तनपुरेंचा थेट इशारा
केंद्रीय सुरक्षा दलाने लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केली आहे. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वान पथके, बॉम्बशोधक आणि नाशक पथकही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखील चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त इत्यादी पोलीस दलातील कर्मचाराही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान ड्रोन उड्डाणासही बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात ड्रोन कॅमेरे, पॅराग्लायडर्सच्या उड्डाणालाही बंदी घालण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त महायुतीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
Narendra Modi नागरिकांसाठी सूचना-
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने, सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी मार्गांचा वापर करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. पुण्यातील प्रमुख मार्गांवर संभाव्य कोंडी टाळण्यासाठी पोलिस विभागाने योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पुणे शहरात येणाऱ्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी या मार्गांबद्दल माहिती घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.