8.8 C
New York

Narendra Modi : त्यांना संधी देऊ नका, पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथे निवडणूक (Narendra Modi) रॅलीला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेस आणि आघाडी देशाला मागे टाकण्याची आणि देशाला कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी महायुती सरकारची स्तुती करताना महाविकास आघाडीलाही टोला लगावला आहे. महायुती कोणत्या वेगाने काम करते आणि आघाडीची ही मंडळी कामे कशी थांबवते, हे चंद्रपूरच्या जनतेला चांगलं कळंत असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीवाले आपला विकास थांबवू पाहताय. त्यांना आपण साथ देणार का? घोटाळे करण्यामध्ये या लोकांना आपण सहकार्य करणार का? असे प्रश्नही नरेंद्र मोदींनी उपस्थितांना यावेळी केले.

“उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान…; राज ठाकरेंची बोचरी टीका

येथील जनता अनेक दशकांपासून रेल्वे जोडणीची मागणी करत होती. मात्र, काँग्रेस आणि आघाडीने हे काम कधीच होऊ दिले नाही. महाराष्ट्राचा विकास हा केवळ आघाडीच्या लोकांचा रोखला आहे. कामाला विलंब करणे आणि गोष्टी थांबवणे हे त्यांचं काम आहे असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. त्याबरोबर मोदींनी आपल्या देशात विकासाला काँग्रेस काय अडवी आली आहे असा थेट घणाघातही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

मी ज्यावेळी पंतप्रधान झालो तेव्हा 370 हटवल. अन्यथा, तिथ महाराष्ट्रातील अनेक जवानांचा देशाची सेवा करता करता मृत्यू झाला. परंतु, आमच्या सरकारने हे बंद केलं आहे. त्याचबरोबर आम्ही 370 संपलं असताना आता जम्मू काश्मीरवाले पुन्हा लागू करत आहेत असा आरोपही पंतप्रदान मोदी यांनी यावेळी केला आहे. तसंच, जे पाकिस्तानला हव आहे ते काँग्रेस आणि तिथली आघाडी करत आहे असा थेट आरोपही मोदी यांनी यावेळी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img