9.3 C
New York

Ashish Shelar : लोकशाही अन् नियतीच्या दरबारात समान न्याय ; शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Published:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल वणी दौऱ्यावर होते. तेथे पोहोचताच हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यादेखील बॅगची तपासणी करा, अशी मागणी केली होती. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) उद्धव ठाकरेवर हल्लाबोल केलाय.

आशिष शेलार यांनी त्यांच्या सोशल मीडिया X अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. घाबरायचे कारण काय? असं म्हणत शेलार यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर लिहिलंय की, घाबरायचे कारण काय? जेवणाच्या ताटावरच ज्यांनी केली होती केंद्रीय मंत्र्यांना अटक..कोरोनात पत्रकारांना आणले फरफटत..कुणाच्या घरावर चालवले बुलडोझर कुणाचे फोडले डोळे..मुख्यमंत्री असताना केवढे केले होते यांनी अनधिकृत चाळे..

ठाकरे गटाचा मुंबई जिंकण्यासाठी खास प्लॅन, अनिल परब म्हणाले

काल त्यांचे नुसते विमान तपासले म्हणून केवढे झाले ओले, युतीच्या मुख्यमंत्र्यांचे ज्यांनी तपासले होते विमान…तीच यंत्रणा वागली तुमच्याशी ही कायद्याने समान ! मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय? लोकशाही आणि नियतीच्या दरबारात असतो समान न्याय ! असं म्हणत शेलार यांनी उद्धव ठाकरेंना बॅग तपासली म्हणून घाबरण्याचे कारण काय? असा तिखट सवाल केलाय. तसेच लोकशाही आणि नियतीच्या दरबारामध्ये समान न्याय असतो, असं देखील आशिष शेलार म्हणाले आहेत.

आज पत्रकार परिषदमध्ये संजय राऊत यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला होता. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या बॅगची काल तपासणी करण्यात आली, तसंच मोदी-शाह यांच्या ताफ्यातून कोणत्या बॅग उतरल्या, असा सवाल देखील केला होता. नाशिकमध्ये शिंदेच्या ताफ्यातून 15 बॅग उतरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img