9.3 C
New York

Ajit Pawar : “..अन् आता तेच मला रिटायर करायला निघालेत”; दाखला देत अजितदादांचं शरद पवारांना उत्तर

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार जोरदार (Maharashtra Elections) सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नव्या आणि उमद्या तरुण उमेदवारांना आता संधी द्यायला हवी असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अजितदादांनी एका मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिली.

तीस वर्षे मला साथ दिली, तीस वर्षे अजित पवारांना साथ दिली आता पुढील तीस वर्षांची व्यवस्था करावी लागेल असे शरद पवार म्हणाले होते. यावर विचारले असता अजित पवार म्हणाले, त्यांची तीस वर्षे झाली आता ते म्हणताहेत की मी कोणत्याही निवडणुकीला उभा राहणार नाही. माझ्यापेक्षा वीस वर्षांनी ते मोठे आहेत. ते आता ८५ वर्षांचे आहेत आणि मला रिटायर करायला निघालेत. ते मात्र ८५ वर्षांपर्यंत काम करु शकतात हा कोणता न्याय? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

महायुती की महाविकास आघाडी?, मेटेरिझचा सर्वेक्षणाने थेट आकडेवारीच मांडली

शरद पवारांनी काही जु्न्या आणि काही नव्या चेहऱ्यांना सोबत घेत काम केलं. मी देखील काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. असं करावंच लागतं. कारण नवीन कार्यकर्ते देखील तयार झाले पाहिजेत यासाठी या गोष्टी करणे गरजेचे असते असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बारामती मतदारसंघात अजित पवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना संधी दिली आहे. युगेंद्र पवार यांच्यासाठी पवार कुटुंबियांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे ही जागा राज्यभरात चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img