6.2 C
New York

Jayant Patil : वसंत मोरे तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ…; जयंत पाटलांनी दिली भरसभेत ऑफर

Published:

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला. राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू केला. शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या प्रचारार्थ आज हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आज जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कात्रजमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी पक्षात येण्याची खुली ऑफर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना दिली. तुमच्या हातात वसंत मोरे आता मशाल आहे, आम्ही कधीही तुमच्या हातात तुतारी देऊ शकतो, असं विधान पाटील यांनी केलं.

जयंत पाटील यावेळी बोलतांना म्हणाले, प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा मतदार संघातशरद पवार यांनी उमेदवारी दिलीय. एकमेव शहर अध्यक्ष ते महाराष्ट्रातील आहेत, जे शरद पवारांसोबत राहिले. तिकडे गेलेल्यांनी प्रशांत जगतापांनी बोलावलं होतं, पण त्यांनी सांगितलं मला तिकडं येण शक्य नाही. मला परत फोन करू नका. अशा निष्ठावान माणसांला तु्म्ही विधानसभेत पाठवा, असं आवाहन त्यांनी केलं.

Jayant Patil पवार साहेबांनी घड्याळाचे काटे थांबवले…

लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातील सरकार घाबरलं अशी टीका करत ते म्हणाले की, आमचं घड्याळ चोरीला गेलेय हा आमचा प्रॉब्लेम झालाय. पण, चोरीला गेलेलं घड्याळ आम्हाला दिसतेय. पवार साहेबांनी त्याचे काटे थांबवलेत, असा टोलाही त्यांनी अजित पवार गटाला लगावला.

पुणे शहरातील ट्रॅफिकच्या नावावर सत्ता भोगली, पण प्रश्न सुटले नाही. पुणे शहराची नवी ओळख ड्रुग्सचे शहर होतेय की काय अशी भीती आहे. पुण्यात अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढल्या. यांच्या हातात सत्ता आहे आणि यांना कोयता गँग कंट्रोल होत नाही. महायुती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले, अशी टीका पाटील यांनी केली.

अमित ठाकरेंना राजकारणातलं काही कळतं का? महेश सावंतांचा सवाल

भाजपकडून कडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन वेळा सुरत महाराजांनी लुटली. फडणवीस ते कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, असा हल्लाबोलही पाटील यांनी केला.

महायुती सरकारने एवढा भ्रष्टाचार केला की, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खाल्ले. गडबडीत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. पुतळा कोसळला, तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. एकनाथ शिंदे म्हणाले, वाऱ्यामुळं पुतळा कोसळला. एक नारळ पडला नाही, मग पुतळा कसा कोसळला, असा सवाल करत या शिवद्रोही सरकार उखडू टाका, असं आवाहन पाटील यांनी केलं

Jayant Patil महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधलं…

मी अर्थमंत्री असताना महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. गुजरात आता पुढे गेला. गुजरातपेक्षा महाराष्ट्र गरीब झाला. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली. 17 उद्योग धंदे महाराष्ट्रात येणार होते ते बाहेर गेले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांनी गुजरातमध्ये महाराष्ट्राचे प्रकल्प जाऊ दिले. महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम महायुतीने केलं, अशी टीकाही पाटील यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img