विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यापाचं राजकारण रंगताना दिसत आहे. ‘एक है तो सेफ है’ ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ मुद्द्यावर सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Jayant Patil नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
अजित पवार ‘एक है तो सेफ है या विधानाला आता विरोध करत आहेत, काही अर्थ याला नाही. त्यांनी त्या आघाडीतून बाहेर पडले तर त्याला अर्थ आहे, त्यांच्या सोबत रहायचे आणि त्यांच्या एका विधानाला विरोध करायचा हे ठीक नाही, असं जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. ते लातूर जिल्ह्यातल्या चाकुर इथ बोलत होते. अहमदपूर मतदार संघातील उमेदवार विनायकराव पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी सभा घेतली, त्या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील यावेळी बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी काय काम केले आहे? ते त्यांनाच माहीत असंही जंयत पाटील यांनी म्हटलं आहे.
कोणकोणाच्या बॅट घशात घालतो, ते 23 नंतर समजेल ; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत, आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 400 खासदार हवे असे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळ बेर दिसत दिसत आहे. मात्र 400 जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. शरद पवार यांनी घटना दुरुस्ती करण्याच पाप यांच्या मनात होतं असं टोला लगावला आहे.