5.2 C
New York

BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात नेमकं काय?

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर आज भाजपने वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय. यावेळी जाहीरनामा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित त्यांनी ‘महाराष्ट्र संकल्पपत्र 2024’ हे जाहीर केलंय. राज्यासाठी आज संकल्पपत्र भारतीय जनता पक्षाच्या (BJP Manifesto) वतीने प्रस्तुत करण्यात आलाय. मुनगंटीवार म्हणाले हा संकल्प राज्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा असल्याचं आहेत. अमित शाह यांच्या हस्ते या संकल्पपत्राचं विमोचन करण्यात आलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस (BJP) यांनी सांगितलं की, आजच्या संकल्पपत्रामध्ये अनेक गोष्टी आहेत. यात 25 गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. आम्ही महायुतीचा त्यातील 10 मुद्द्यांत दहाकलमी कार्यक्रम घोषित केलाय. 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. भावांतर योजना आणून जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

प्रत्येक गरीबांना अन्न आणि निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय घेतलाय. वृद्ध पेन्शन योजना ही 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासाठी मार्केट इंटरवेन्शन करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 25 लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. त्यासोबत 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून लाभ देऊ. सरकार स्थापनेच्या 100 दिवसांमध्ये व्हिजन डॉक्यूमेंट तयार करू. मेक इन महाराष्ट्राचं धोरण प्रभावीपणे राबवू, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

2027 पर्यंत 50 लाख लखपती दिदी तयार करण्याचा भाजपचा संकल्प आहे. महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार आहोत. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र सुरू करणार आहोत. युवांच्या फिटनेससाठी क्रीडा क्षेत्रात आणि फिटनेसच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध करणार आहोत. गडकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सौर आणि अक्षय उर्जेचा वापर करून वीज बिलात 30 टक्क्यांवर सूट देणार आहेत. व्हिजन डॉक्युमेंट तयार करू. विज्ञानामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर ठेवणार. मेक इन महाराष्ट्रासाठी प्रयत्न करणार आहोत. फिनटेक आणि एआयमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घोषणा सरकार आणण्यासाठी आहे. तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी आम्हाला कौल द्या. शरद पवार ज्याप्रकारे दावा करतात, त्याचा काहीच सबंध नसतो. यावेळी त्यांची खेळी चालणार नाही, असं केंद्रिय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हाला तुम्ही किमती मतदान द्या, असं आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img