8.8 C
New York

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनाम्यात कोणती आश्वासने?

Published:

राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) अवघ्या 1o दिवसांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलंय. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा हा जाहीरनामा आहे, असा देखील उल्लेख महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय. या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खर्गे, मनोज सिंघवी पवन खेरा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत उपस्थित होते. महिलांना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना आणणार असून त्यातून महिलांना तीन हजार रुपये देणार आहे. शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. तसेच बेरोजगार युवकांना दर महिन्याला चार हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. काँग्रेस नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.

यावेळी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्राची निवडणूक देशाचं बदलवणारी निवडणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे.मुंबईत देशाच्या विभिन्न भागातील लोकं आशा घेवून येतात. उपाशी मरणार नाही, काहीतरी काम मिळेल या आशेनं येतात.त्यामुळेच आमचा महाराष्ट्रनामा आज आम्ही जाहीर करत आहोत. खूप अभ्यास करून हे घोषणापत्र निर्माण करण्यात आलंय. -यापूर्वी आमच्या चार नेत्यांनी 5 गॅरंटीवर मुद्दे मांडले आहे. आज आमचं घोषणापत्र सविस्तर प्रकाशित करत आहोत, असं खर्गे म्हणाले आहेत. त्यांनी मुंबईचा दोन वेळा बॉंबे म्हणून उल्लेख केलाय.

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये भविष्यातील महाराष्ट्राला पाहता पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत. निरोगी महाराष्ट्र, उद्यमी महाराष्ट्र, पर्यावरण समृद्ध महाराष्ट्र, सर्व समावेशी महाराष्ट्र आणि सशक्त नागरी महाराष्ट्र या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्थान देण्यात आलेले आहे. या जाहीरनाम्यात पहिल्या शंभर दिवसात करण्यात येणाऱ्या योजनांचा आणि उपाय योजनांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

महालक्ष्मी अंतर्गत महिलांना प्रतिमहिना 3000 रुपये देणार आहेत. महिलांना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. स्वयंपाकाचे सहा गॅस सिलेंडर प्रत्येकी 500 रुपये उपलब्ध करणार आहेत. महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हटलंय. महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, युवक शिक्षण,आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय, जनतेच्या हितासाठी, शहर विकास, सुशासन, महाराष्ट्राचा स्वाभिमान या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे.

महायुतीचा मुख्यमंत्री होणार?, अमित शाह यांनी काय दिलं उत्तर?

Mahavikas Aghadi या केल्या घोषणा

जातनिहाय जनगणना आम्ही लोकांमध्ये विभाजन करण्यासाठी करत नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. सहा गॅस सिलेंडर त्यात महिलांना देण्यात येणार आहे. शक्ती कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी लागू करणार आहे. एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन ४५ दिवसांत निकाल लावण्यात येणार आहे.

Mahavikas Aghadi हे महत्वाचे मुद्दे

राज्यात अडीच लाख सरकारी पदे रिक्त आहे. त्या भरण्यात येणार आहे.
२५ नगरपालिकांच्या निवडणुका अजून झाल्या नाही. त्या आमचे सरकार आल्यावर करणार आहे.
जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या खात्यावर विशिष्ट रक्कम ठेवण्यात येणार आहे.
संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना आता दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये देण्यात येणार आहे.
महायुती सरकारने काढलेल्या अध्यादेशांचा आढावा घेण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img