5.3 C
New York

Jayant Patil : शिंदे-फडवणवीसांचे सरकार उखडून टाका,जयंत पाटलांचे टिकास्त्र

Published:

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , देवेंद्र फडणवीस , अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुजरातमध्ये महाराष्ट्राचे प्रकल्प जाऊ दिले. प्रकल्प आणि उद्योग गुजरातला जात असताना यांनी ब्र देखील काढला नाही. गुजरातला महाराष्ट्र आंदन दिला, अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.जयंत पाटील यांची आज शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, अशोक बापूंनी एनसीडीसीकडे कारखान्यासाठी 107 कोटीचं मार्जिन लोन मागितलं. ते त्यांना देण्यात आलं नाही.वाईला एक कारखाना आहे, तो 600 कोटींनी तोट्यात असतानाही त्या कारखान्याला पाचसे कोटी दिले. 600 कोटीचं कर्ज असतांना 500 कोटी पुन्हा दिले. कारण त्या कारखान्याचे संचालक महायुतीसोबत गेले आणि पवार साहेबांशी निष्ठा बाळगून असणारे अशोक बापूंना कर्ज नाकारलं. अशोक बापू तुम्ही चिंता करू नका. आपलं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत 107 कोटीचं कर्ज तुमच्या कारखान्याला देऊ, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील यांनी सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही टीका केली. जयंत पाटलांच्या कारखान्याला 1400 कोटी रुपये दिले असं मोहोळ म्हणाले. अहो मोहळ, आम्ही एनसीडीसीच्या दारात कधी जात नाही. एनसीडीसीची गैरवापर करून माणसांना वाकवायचं काम दिल्लीचं सरकार करतेय, मोहोळांना सहकार खात समजायला अजून बराच वेळ आहे, अशा शब्दात त्यांनी मोहोळ आणि मोदी सरकावर निशाणा साधला.

रोहित पवारांचा युती सरकारवर हल्लाबोल,म्हणाले

अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज यांचे काल अपहरण करण्यात आलं. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, कालचा प्रकार धक्कादायक होता. असं कधी आजवर झालं नाही. मात्र, या पद्धतीने राजकारण जात असेल तर ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. येननेक प्रकारे व्यक्तिगत निंदा-नालस्ती, बदनामी करून आपली खुर्ची टिकवायचा उद्योग करणाऱ्यांना घरी पाठवा आणि तुतारी चिन्हा दाबून अशोक बापूंना विधानसभेत पाठवा, असं आवाहन पाटील यांनी केलं.

Jayant Patil शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला…

निष्ठेची पुजा होत असते, चोर लफंग्यांचं नाव कधी निघत नाही. एकनात शिंदे, देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांनी गुजरातमध्ये महाराष्ट्राचे प्रकल्प जाऊ दिले. प्रकल्प आणि उद्योग गुजरातला जात असताना यांनी ब्र देखील काढला नाही. गुजरातला महाराष्ट्र आंदन दिला. शिंदे – अजित पवार यांच्या डोक्यावर तर टांगती तलवारच आहे, आणि फडणवीस तर मोदी-शाहांसमोर बोलूच शकत नाही. या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.

Jayant Patil महायुती सरकार उखडून टाका…

महायुती सरकारने एवढा भ्रष्टाचार केला की, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खाल्ले. पुतळा कोसळला, तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. आणि शिंदे सांगतात की वाऱ्याने पुतळा पडला. अहो, वाऱ्याने पुतळा पडला तर त्या ठिकाणी एकही झाड का पडलं नाही, असा सवाल करत या सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमाना दुखावला, त्याची शिक्षा या सरकारला झाली पाहिजे. याचं सरकार उखडू टाका, असं आवाहन पाटील यांनी केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img