पोर्शे कार अपघाताप्रकरणात (Porsche car accident) नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) पाठवल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी केला. तर सुनील टिंगरे यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, टिंगरेंनी पाठवलेली नोटीसच आता समोर आली. या नोटीसमध्ये टिंगरेंनी शरद पवारांसह, कॉंग्रेस आणि शिवसेनेला नोटीस पाठवल्याचे दिसते. बदनामी केल्याप्रकरणी टिंगरेंनी ही नोटीस पाठवली आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंवर आरोपींना मदत केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळं शरद पवारांनी तर भरसभेत टिंगरेंवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठल्याचा दावा सुळेंनी केला हेता. त्या म्हणाल्या होत्या की, पोर्श कार अपघातात ज्या दोन युवक युवतींचा मृत्यू झाला, त्यांच्या आईवडिलांचेश्रू आजही थांबलेले नाहीत. इथल्या स्थानिक नेत्यांनी पोर्श कार ज्याची होती, त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खाऊ घातला. ज्यांनी पोर्शे कार अपघातातील आरोपींना मदत केली, त्याच नेत्यांनी या अपघात प्रकरणात माझी बदनामी केल्यास मी तुम्हाला कोर्टात खेचेन, अशी नोटीस शरद पवारांना पाठवल्याचं म्हटलं.
मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी क्लिअरचं केलं
शरद पवारांना ईडीची भीती वाटत नाही, ते तुमच्या नोटीसला कशाला घाबरतील. मी आव्हान देते की, एकदा नव्हे तर शंभर वेळा मी तुमच्या विरोधात बोलणार. हिंमत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनाही नोटीस पाठवा, असे आव्हान सुळेंनी टिंगेरंना दिलं. यानंतर सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी वैयक्तिक साहेबांना कोणतीही नोटीस दिली नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात चुकीचा प्रचार होऊ नये या हेतूने मी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना दिली. आपण शहानिशा न करता चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्यावर कोणतेही वक्तव्य करू नये, अशा पद्धतीची मी नोटीस दिली. वैयक्तिक साहेबांना कोणतीही नोटीस दिली नाही.
दरम्यान, या नोटीसवर शरद पवारांचं नाव लिहण्यात आलेलं आहे. पोर्शे प्रकरणात बदनामी करू नये, अशी ही नोटीस आहे. नोटीसवर पवारांचं नाव असल्याने ही नोटीस त्यांनाच दिली आहे. पवारांसह काँग्रेस, ठाकरेगटालाही नोटीस पाठवण्यात आली.