वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणारे (Maharashtra Elections) अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सायंकाळी आमदार रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) प्रचार पदयात्रेने आणि जाहीर सभेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. पठारे यांनी आपल्या प्रचाराला गती दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची (Supriya Sule) शुक्रवारी येरवड्यात जाहीर सभा झाली होती. त्यानंतर काल लोहगाव परिसरात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते .’उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील आणि वडगाव शेरीत नवा राजकीय इतिहास घडविला जाईल’,असे उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले. पदयात्रेच्या शेवटी जाहीर सभा झाली आणि आमदार पवार यांनी आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतला.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध…
रोहित पवार म्हणाले,’काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात विकास होत होता. तो भाजपने थांबवला. येणाऱ्या कंपन्या दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी गुजरातमध्ये हलवल्या. त्यामुळे इथल्या होतकरू तरुणांवर अन्याय झाला. १५ लाख युवक दरवर्षी रोजगार शोधत फिरत असतात. हे पाहून शांत बसू नका, लढायला हवे. बूथवर लक्ष द्या. आपले सरकार येत आहे, ६० हजार कोटींचा भ्रष्टाचार उकरून काढू असे रोहित पवार म्हणाले.
‘फडणवीस हे सर्वात खोटे बोलणारे नेते आहेत. ते महाराष्ट्र्राला फसवत आहेत. ते जनरल डायर आहेत. ते अभिमन्यू नाहीत. तरुणांना, महिलांना न्याय देऊ शकले नाहीत. चक्रव्यूहातून सोडवू शकले नाहीत. या चक्रव्यूहातून फक्त शरद पवार हेच सोडवू शकतात. सामान्य जनता हीच त्यांची ऊर्जा आहे. महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी ते लढत आहेत. १७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. गुजरातशाही इथे येऊ देणार नाही. सभेची वीज घालविणाऱ्यांची वीज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घालवू . विरोधकांचे आम्ही बारा वाजवू.’असाही घणाघात रोहित पवार यांनी केला.
‘रामकृष्ण हरी,वाजवू तुतारी ‘,’शरद पवार साहेब आगे बढो’.’महाविकास आघाडी आगे बढो ‘ अशा घोषणा त्यांनी उपस्थित समुदायाला द्यायला लावल्या, त्याला अर्थातच प्रचंड प्रतिसाद मिळाला.