5.5 C
New York

Amit Shah : आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण; अमित शाहांचे CM पदाबाबत मोठं विधान

Published:

विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) किंवा महायुती (Mahayuti) कुणीही मुख्यमंत्री जाहीर केलेला नाही. त्यामुळं निवडणुकीनंतर राज्यात कुणाचं सरकार कुणाचं येणार? आणि कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं.

आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं. अमित शाह यांनी रविवारी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लाडकी बहीण योजनेच्या महिलांना देण्यात येणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार, तरुणांना 25 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन भाजपकूडजन देण्यात आलं. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं. आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढवत आहे. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं.

सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलेल्या नोटीसवर टिंगरेंची सही, पवारांसह कॉंग्रेस, सेनेलाही कोर्टात ओढलं…

काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत बोलताना शाह यांनी असेच वक्तव्य केले होते. मी दीड महिन्यापूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र या भागाचा दौरा केला. तेव्हा महायुतीचं सरकार आणायचं आणि फडणवीस यांना विजयी करायचं, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे, असं शाह म्हणाले होते.

यावेळी शाह यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, राज्यात सर्वाधिक दंगली आघाडी सरकारच्या काळात झाल्या आहेत. काँग्रेसने संघावर तीनदा बंदी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी संघ अधिक मजबूत झाला आहे. आता काँग्रेसचे सरकार येणार नाही नाही. कारण, पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार निवडून येईल, असा दावाही त्यांनी केला.

शाहांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. यंदा आम्ही शरद पवार यांना मुख्यमंत्री निवडण्याची संधी देणार नाही. पवारांना खोट्या कहाण्या रचण्याची सवय झाली. मात्र यंदा त्यांच्या कहाण्या यशस्वी होणार नाही, असं शाह म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img