7.5 C
New York

Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रि‍पदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी क्लिअरचं केलं

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू (Maharashtra Elections) आहे. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चांगलाच पेच निर्माण झाला होता. सध्याच्या परिस्थितीत हा मुद्दा मागे पडल्याचे दिसत असतानाच शरद पवार यांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्यांचं ताजं वक्तव्य उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार आहे. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री असेल असे शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अजून ठरलेला नाही. हा मुद्दा बाजूला ठेऊन तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र शिवसेना या मुद्द्यावर जास्त आग्रही होती. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं होतं. त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरेंनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केले होते. परंतु, दोन्ही पक्षांनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं.

आधी लाडक्या बहि‍णींना भर सभेत धमकी नंतर जाहीर माफी, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्राचा मु्ख्यमंत्री कोण असेल? उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांपैकी कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवला जाईल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीतील नेते मंडळी बसून यावर चर्चा करू. जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री होईल. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्यांना आम्ही विनंती करू की तुमच्या प्रतिनिधीची निवड करा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. माझ्या पक्षाचं हेच धोरण आहे, असे शरद पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img