7.5 C
New York

BJP : भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Published:

अवघे काही दिवस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ला शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकाच टप्प्यातराज्यात निवडणूक होणार असून मतदान 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. भाजपकडून (BJP) या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थितीत होते.

भाजपच्या संकल्पपत्रात लाडकी बहिणी योजनेबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही पुढील ५ वर्षात भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

फडणवीसांनी मांडलं महायुतीचं व्हिजन

BJP भाजपच्या संकल्पपत्रातील 25 महत्त्वाच्या घोषणा

लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० रुपयांवरुन २१०० रुपये दिले जाणार महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण महिलांच्या सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजार वरुन १५ हजार प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार वृद्ध पेन्शन धारकांना १५०० वरुन २१०० रुपये दिले जाणार जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार २५ लाख रोजगार निर्मिती महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन ग्रामीण भागात ४५ हजार गावात पांधण रस्ते बांधणार अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img