5.2 C
New York

Manoj Jarange : “ज्याला पाडायचं त्याला पाडा पण..” जरांगेंचा निवडणुकीसाठी फायनल निर्णय

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरची (Manoj Jarange) जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी काही आडाखे मनाशी पक्के केले आहेत. आज त्यांनी याबाबत आणखी स्पष्टता आणली. तुमच्या हिताचा निर्णय घ्या. ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. काहीच संभ्रम नकोच. कारण, काय करायचं याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी दिशा स्पष्ट केली. मराठा समाजाने आपल्या हिताचा निर्णय घ्या, ज्याला पाडायचं त्याला पाडा असे आवाहन केले.

Manoj Jarange काय म्हणाले मनोज जरांगे

या निवडणुकीत आपल्या मतांशी जो उमेदवार सहमत आहे त्यालाच मत द्या. ज्या लोकांनी आरक्षणाला विरोध केला. आरक्षण मिळवू दिलं नाही त्यांना मात्र सोडू नका. कोणत्याही परिस्थितीत आपली मतं वाया जाता कामा नयेत. यासाठी मराठ्यांनी आता आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांचे गावागावात व्हिडिओ घ्यावेत. लेखी घेण्यापेक्षा व्हिडिओ घेतलेले चांगले राहिल. मी कोणताही पक्ष सांगितलेला नाही किंवा कोणत्या पक्षाला पाठिंबाही दिलेला नाही. मला पूर्ण वेळ मराठा समाजासाठीच्या आरक्षण आंदोलनासाठी द्यायचा आहे. ज्यांनी कुणी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना मात्र सोडायचं नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या संकल्पपत्रात नेमकं काय?

मराठ्यांची पोरं सध्या अडचणीत आहेत. आरक्षण मिळालं नाही आणि शेती मालाला भाव नाही त्यामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे आपलं आंदोलन सुरुच राहणार आहे. आरक्षणापासून मी माझी भूमिक कधीच बदलत नाही. निवडणुकीत मोठं होण्यासाठी अनेक जण रडरड करतात ही रडरड त्यांनी समाजाच्या आरक्षणासाठी करावी असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

या निवडणुकीत मराठा समाज सक्रीय आहे. कुणाला मतदान करायचं हे समाजाला चांगलं कळतं. त्यांच्यात कोणताच संभ्रम नाही. सध्या ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करतील. मराठा समाजासाठी आरक्षण महत्वाचं आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यातल्या सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेतून दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img