5.5 C
New York

Uddhav Thackeray : त्याला तिकडचं…; उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर टीका

Published:

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगोल्यामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली. रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट पाहिजे. ते सुद्धा गुवाहाटीचं. त्यांना परत जाऊ द्या, काय झाडी, काय डोंगर त्यांना तिकडेच मोजत बसू द्या, असं म्हणत ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, देव संधी देत असतो, संधीचं सोने करायचं की माती करायची हे ज्याचं त्याने ठरवायचे. गेल्या वेळी आम्ही एका गद्दाराला उमेदवारी दिली. तुम्ही सर्वांनी त्यांना विधानसभेत पाठवलं. मात्र, त्यांनी संधीचं सोन नाही तर आयुष्याचं मातेरं केलं. किती माज असायला पाहिजे? त्यांना हे माहित नव्हतं, ज्या लोकांनी मोठं केलं, ते त्यांचा माज देखील उतरवू शकतात. मी त्यांचा माज उतरवायला आलो. गद्दारांना गाडायला आलो, असा इशारा ठाकरेंनी दिला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मी गद्दारांच्या छाताड्यांवर पुन्हा भगवा गाडायला आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे, तो कधी गद्दारांना माफ करत नाही. गद्दारांना सांगायचं आहे, तिथला डोंगर तू पाहिलास. पण इथल्या रायगडाचे टकमक टोक नाही पाहिलं. ते तुला 23 तारखेला दिसणार आहे. ज्या टकमक टोकावरून सर्व जनता तुझा राजकीय कडेलोट करेल, असं ठाकरे म्हणाले.

पोलीस महासंचालक तात्पुरते नको, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

मी प्रामाणिकपणे सांगतो, गेल्याचवेळी दीपक आबांना उमेदवारी देणार होतो. पण, मध्येच धरण फोडणारा खेकडा घुसला. त्याने सांगितलं. माझं ऐका, हा शंभर टक्के निवडून येतो. मग मी त्याला उमेदवारी दिली, असं म्हणत ठाकरेंनी तानाजी सावंतांवरही हल्लाबोल केला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवरही निशाणा साधला. आज पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत आहेत. लगे रहो मुन्नाभाईमधील सर्किटसारखी त्यांची अवस्था आहे. इथे येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील कलम 370 बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना आम्ही कलम 370 हटवण्यास विरोध करणाऱ्यांसोबत आहोत, असंत ते म्हणतात. पण कदाचित अमित शाहांना स्मृतिभ्रंश झाला आहे, कारण जेव्हा कलम 370 हटवण्यात आले तेव्हा आम्हीही त्या निर्णयाला पाठिंबा दिला होता, असं ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img