कोल्हापुरमध्ये भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाडिक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन कॉंग्रेसच्या सभांना जाणाऱ्या महिलांचे (Ladki Bahin Yojana) फोटो आणि व्हिडिओ काढा. त्यांची मी व्यवस्था करतो. असं धमकीवजा इशारा देणारा वक्तव्य धनजंय महाडिक यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात तणावाचं वातावरण आहे. यांसदर्भात महाडिक यांनी महिलांची जाहीर माफी मागितली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देखील दिलंय.
भाजप खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, माझ्या वक्तव्यामुळे जर कोणत्याही माता भगिणींचं मन दुखावलं असेल, तर त्यांची माफी मागतो. माझं वक्तव्य कुणाचा अपमान करण्यासाठी नव्हतं, असं म्हणत धनंजय महाडित यांनी कोल्हापुरमधील (Kolhapur) सभेत केलेल्या वक्तव्यावर महिलांची जाहीर माफी मागितलेली आहे. विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, असा आरोप देखील महाडिक यांनी केलाय. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. कॉंग्रेस नेत्यांना बोलण्यासारखे आता काहीच मुद्दे राहिले नाही, म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत, असं देखील महाडिक म्हणाले आहेत.
“अरे, बाप नाही पण तुझा काकाच..” जयंत पाटलांचं अजितदादांना जशास तसं उत्तर
ज्या महिला कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील, त्यांचे फोटो पाठवा. त्यांची आपण व्यवस्था करू, असं मी म्हटलंय. कदाचित त्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नसेल, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिलंय. तर निवडणूक काळात विरोधी पक्ष खोटा प्रचार करत आहे. अशा प्रचाराला काही महिला बळी पडत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजना केवळ महायुती सरकारमुळे यशस्वी झाली, असं नमूद करताना महाडिक यांनी हे वक्तव्य केल्याचं म्हटलंय.
मी महिलांचा वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात नेहमीच सन्मान करत आलोय. त्यामुळे माझ्या प्रयत्नांची दखल घेवून माझ्या वक्तव्याने दुखावल्या गेलेल्या माझ्या माता भगिणी मला मोठ्या मनाने माफ करतील, असं महाडिक म्हणाले आहेत. महिलांना धमकी देण्यासाठी हे वक्तव्य नव्हतं. विरोधक अशाच संधीची वाट पाहात होते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने फेक नरेटीव्ह सेट करून महिला अन् विशिष्ट समुदायाचं मतदान घेतलं. परंतु, आता विधानसभेत योजनांचा लाभ घेणारे लोक महायुतीसोबत राहावेत, अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केलीय.