ज्यांच्या प्रेरणेने भारतात आम्ही काम करत आहोत असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांना महाराष्ट्रात अस्तित्वात आणण्यासाठी या संकल्पपत्रातून होत आहे. संकल्प पत्र कागदाचा डॉक्युमेंट नाही. पूर्ण ताकदीने काम करण्यासाठीचं पवित्र डॉक्युमेंट आहे. आज १२ वाजता एक स्थगिती पत्र येणार आहे. या राज्यात ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यास रस आहे, अशा लोकांचं पत्र १२ वाजता येणार आहे. पण जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, भाजपवर आहे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणालेत.
Devendra Fadnavis लाडक्या बहिणींसाठी भाजपचं प्लॅनिंग, योजनेची रक्कम वाढवणार
आजचं संकल्पपत्रात अनेक गोष्टी आहेत. ज्या २५ गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील १० मुद्दे जो आम्ही महायुतीचा दहाकलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
आधी लाडक्या बहिणींना भर सभेत धमकी नंतर जाहीर माफी, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis वृद्धांसाठीच्या पेन्शनमध्ये वाढ
प्रत्येक गरीबांना अन्न व निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्ध पेन्शन योजना १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणार आहोत. आम्हीच ते १५०० रुपये केले होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासाठी मार्केट इंटरवेन्शन करणार आहोत. महाराष्ट्रात २५ लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. त्यासोबत १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून लाभ देऊ. सरकार स्थापनेच्या १०० दिवसात व्हिजन डॉक्यूमेंट तयार करू. मेक इन महाराष्ट्राचं धोरण प्रभावीपणे राबवू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.