10.3 C
New York

Jammu and Kashmir : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, 3 जवान जखमी तर एक शहीद

Published:

जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत (Kishtwar Encounter) लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे तर तीन जवान जखमी झाले आहे.

माहितीनुसार, या चकमकीत जखमी झालेले 1 पॅरा (स्पेशल फोर्स) चे सैनिक नायब सुभेदार राकेश कुमार यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी लष्कराच्या जवानांवर उदमपूर येथील बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाडमधील चास जंगल परिसरात दहशतवादविरोधी अभियान सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी दोन व्हीडीजी सदस्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका ग्रुपला घेरण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. याच बरोबर श्रीनगरच्या जबरवान जंगल परिसरातही दहशतवादविरोधी अभियान सुरू आहे.

तर दुसरीकडे 9 नोव्हेंबर रात्री सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. या चकमकीबद्दल माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, बारामुल्लाच्या सोपोर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली होती.

या माहितीवरून कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस आणि सुरक्षा दलांनी मिळून केली आहे. या कारवाईत दोन्ही बाजूने गोळीबार झाला आणि गोळीबारात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकांनी एका दहशतवाद्याला ठार केले. अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img