5.5 C
New York

Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? सरकार बदलल्याशिवाय..” शरद पवारांची जोरदार फटकेबाजी

Published:

शरद पवार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर (Sharad Pawar) फिरून प्रचार करत आहेत. परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

परांडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने राहुल मोटे यांना तिकीट दिलं आहे. या सभेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. त्यांनी भाषणात या वयातही शरद पवार राज्यभरात प्रचारासाठी फिरतात. १६ वर्षांच्या युवकाला लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले, ओमराजे मला तुमची एक गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का, हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. आता एक म्हातारा खांद्यावर बसून आलेला पाहिला का? असे पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

पवार पुढे म्हणाले, ही विधानसभा आता तुमच्या विचारांच्या लोकांच्या हातात असली पाहिजे. सत्ता हातात असली की लोकांचे प्रश्न सोडवता येतात. माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे. त्याच्या घरातील मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत. त्यासाठी आम्ही काम करत आहोत. महाविकास आघाडीचे संघटन उभे केले आहे. महिलांनी संधी देण्यासाठीच महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

अमित शाह यांचा उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला

दरम्यान, भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने परंडा विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ. परंडा-भूम-वाशी या तीन तालुक्यांत तब्बल 247 गावांमध्ये हा मतदारसंघ पसरला आहे. दुष्काळी भाग असला तरी ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचे अस्त्र. ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मसिंह पाटील यांनी याच अस्त्राच्या जोरावर आपला प्रभाव तयार केला होता.

या प्रभावातून त्यांनी महारुद्र मोटे यांचे नेतृत्व उभे केले आणि घडवले. ते 1985 आणि 1990 असे सलग दोनवेळा ते आमदार झाले. 1995 मध्ये महारुद्र मोटे यांचा काही मतांनी पराभव झाला. त्याचवर्षी महारुद्र मोटे यांचे निधन झाले. त्यानंतर बरेच वर्ष काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला बरेच वर्ष खमके नेतृत्वच मिळाले नाही. 2004 मध्ये शरद पवार यांनी महारुद्र यांचे चिरंजीव राहुल मोटे यांना तिकीट दिले. शांत आणि मितभाषी स्वभाव, वडिलांनी करुन ठेवलेले काम, बाणगंगा कारखान्याच्या माध्यमातून उभं राहिलेलं नेटवर्क, शरद पवार यांची ताकद आणि पद्मसिंह पाटील यांची साथ अशी सगळी समीकरणे परफेक्ट बसली आणि मोटे पहिल्याच फटक्यात आमदारही झाले. 2009 आणि 2014 मध्येही मोटे यांनीच बाजी मारली होती. आता पुन्हा राहुल मोटे मैदानात आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img