बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे (Salman Khan) सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एकदा त्याला धमकी देण्यात आली आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून दिली गेल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा मेसेज आला. गुरुवारी रात्री 12 वाजता ही मेसेज मिळाला. यात म्हटले आहे की सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर एक गाणे लिहिण्यात आलं आहे. त्याला सोडले जाणार नाही.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आता जी ताजी धमकी मिळाली आहे. त्यामागे देखील लॉरेन्स बिश्नोई टोळी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवारी रात्री मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज मिळाला. त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
दरम्यान, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली एका जणाला बुधवारी ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा व्यक्ती राजस्थानातील जालौर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हावेरी पोलीस अधीक्षक अंशु कुमार यांनी सांगितले की महाराष्ट्र एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही हावेरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. यानंतर त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा आरोपी हावेरी येथे येण्याआधी कर्नाटकातील विविध शहरांत राहत होता.
फडणवीस यांनी संविधानाच्या रंगावरून केलेल्या टिकेवर राहुल गांधी भडकले
Salman Khan शाहरुख खानलाही धमकी
सलमान खान प्रमाणेच अभिनेता शाहरुख खानला देखील (Shahrukh Khan) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर वांद्रे पोलिसांनी तातडीने केस दाखल करून घेत तपास सुरू केला. आता अशी माहिती समोर येत आहे की शाहरुख खानला धमकी देणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी हा कॉल ट्रेस केला आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धमकीचा फोन शाहरुख खानची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीजच्या ऑफिसमध्ये आला होता. यानंतर जोरदार खळबळ उडाली. धमकीची तक्रार पोलिसांत करण्यात आली.