11.5 C
New York

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही

Published:

पाकिस्तानात पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धांबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. भारत सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी टीम इंडियाला (Team India) परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता टीम इंडिया पाकिस्तानात (Pakistan) जाऊन खेळण्याची शक्यता मावळली आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आणि आयसीसीची डोकेदुखी (International Cricket Council) वाढणार आहे.

यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. याआधी मात्र बोर्डाने अशा कोणत्याही पद्धतीने सामने आयोजित केले जाणार नाहीत असे स्पष्ट केले होते. भारतीय संघाला पाकिस्तानात घेऊन येण्याची जबाबदारी आयसीसीची आहे असे बोर्डाने स्पष्ट केले होते. परंतु, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सूर बदलले आहेत. पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार भारताचे सर्व सामने युएईमध्ये होणार आहेत.

Champions Trophy दुबई किंवा शारजाहमध्ये सामने

पाकिस्तान दौऱ्यात सर्वात मोठा मुद्दा सुरक्षिततेचा आहे. याच कारणामुळे भारत सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की जर भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात येऊन खेळण्याची परवानगी दिली नाही तर हायब्रीड मॉडेलवर खेळण्यास आम्ही तयार आहोत. अशात भारतीय संघाचे सर्व सामने दुबई किंवा शारजाहमध्ये आयोजित केले जाऊ शकतात.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबीचे म्हणणे आहे की बीसीसीआयने आम्हाला लेखी स्वरुपात लिहून द्यावे की भारत सरकारने क्रिकेट संघाला पाकिस्तान खेळण्याची परवानगी दिली आहे किंवा नाही. यातच आता पाकिस्तानी मीडियातून बातम्या येत आहेत की चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धांचे वेळापत्रक 11 नोव्हेंबरला जारी केले जाऊ शकते.

Champions Trophy आठ संघात होणार १५ सामने

चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या स्पर्धांची सुरुवात १९ फेब्रुवारील होईल. अंतिम सामना ९ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडिया द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार आयसीसीचे एक पथक १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत लाहोरला पोहोचेल. या पथकाकडून स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. याच दरम्यान ११ नोव्हेंबरला वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

शेड्युलनुसार ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांग्लादेश हे चार संघ असू शकतात. ग्रुप बी मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान असू शकतात. टूर्नामेंट १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या दरम्यान होईल. या स्पर्धेत ८ संघ आणि एकूण १५ सामने होतील. हे सर्व सामने पाकिस्तानातील लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरांत होतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img