8.3 C
New York

Supriya Sule : सरदेसाईंच्या पुस्तकात सुनेत्रा पवारांचंही नाव, सुप्रिया सुळे भडकल्या; फडणवीसांवर आगपाखड

Published:

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील दाव्यांमुळे ऐन निवडणुकीत राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. या पुस्तकात महायुतीमधील छगन भुजबळ यांच्या बाबतीत खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याही नावाचा उल्लेख या पुस्तकात आहे. यावर विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा उल्लेख केला. राजदीप सरदेसाई यांनी हे पुस्तक लिहीलं आहे. त्यात एक मोठा दावा केला आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे. यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणं, घर फोडणं हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी अदृश्य शक्ती करत आहे हे मी वारंवार सांगत आले आहे. ईडी आणि सीबीआयच्या जवळपास 95 टक्के केसेस फक्त विरोधी पक्षांवर आहेत. त्याचाही उल्लेख या पुस्तकात आहे.

कॉंग्रेसच्या शिलेदारांसाठी प्रियांका गांधी मैदानात

या पुस्तकात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचंही नाव आहे. सुनेत्रा पवार यांचं नाव यात आणायची काय गरज होती? यात महिलांना कशासाठी आणताय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. तुमची राजकीय लढाई आहे ना मग आमच्याशी लढा. आमच्या घरातील महिलांवर का हल्ले करताय अशा शब्दांत खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला. सुळे पुढे म्हणाल्या, मला फडणवीसांना विचारायचं आहे की जेव्हा आर. आर. पाटलांवर आरोप झाले त्या फाइलवर अंतिम चौकशी कुणी लावली. फडणवीसांनीच लावली. कारण मु्ख्यमंत्री म्हणून त्यांचीच सही आहे. ज्यांच्या विरोधात फडणवीस होते त्या अजित पवार यांना बोलावून ती फाइल दाखवली. हा गुन्हा आहे. त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे. त्यांनी राज्याची फसवणूक केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img