9.9 C
New York

PM Narendra Modi : काँग्रेसकडे घोटाळापत्र, मोदींचा नाशिकमधून विरोधकांवर हल्लाबोल

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उतरले आहे. आज त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी प्रचार केला. या वेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेससह (Congress) महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी पुन्हा एकदा नाशिकमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. राज्यात सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपये मिळणार असं देखील ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये आज विकास होत आहे. देश नवीन रेकॉर्ड बनवत आहे कारण देशात गरिबांची चिंता करणारी सरकार आहे. जेव्हा गरिबांचा विकास होते तेव्हा देशाचा विकास होतो असं मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात आज हायवे आणि एक्सप्रेस वे तयार होत आहे. 50 लाख पेक्षा जास्त महिलांना राज्यात उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळाला आहे. तसेच विकास काम होत आहे. म्हणून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सरकार गरजेचे आहे. आज राज्यात शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे मात्र पुन्हा एकदा आमची सरकार आली तर ही मदत 15 हजार रुपये होणार असल्याची घोषणा देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केली.

काँग्रेस आणि आघाडीने देशाला कमजोर करण्याचा काम केला. विरोधक देशाला कमजोर करण्याची एकही संधी सोडत नाही अशी टीका देखील मोदींनी यावेळी केली. राज्यात जर विकासाचे काम पूर्ण झाले नाही तर तरुणांना रोजगार मिळणार नाही आणि काँग्रेस आणि आघाडीचे लोक हेच करत आहे. यांनी अटलसेतूचा विरोध केला, मेट्रोचे काम थांबवले. त्यांनी समृद्धीत महामार्गाच्या कामात अडचणी आणल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला संविधान, कोर्ट आणि देशाशी काहीच घेणंदेणं नाही.

शरद पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर अन्याय केला; कराडमध्ये अमित शाह कडाडले

75 वर्षांपासून काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू केलं नाही. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू झाले आणि हीच माझ्याकडून आंबेडकरांना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. मात्र काँग्रेस पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये 370 लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्ष राज्यात फक्त भष्ट्राचार झाला आहे. काँग्रेस पक्ष फक्त कुंबड्यावर जिवंत आहे. काँग्रेस राजकारणात स्वतःला वाचवण्यासाठी एसटी, ओबीसी आणि एससी समाजाला एकमेकांशी लढवण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना तेव्हाच आरक्षण मिळाला जेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती. त्यामुळे आम्ही एकत्र राहिले तरच सेफ राहील असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जिथं काँग्रेस आहे तिथे भष्ट्राचार आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये सरकार चालवण्यासाठी काँग्रेसकडे पैसे नाही. आमच्याकडे घोषणापत्र आहे तर काँग्रेसकडे घोटाळापत्र आहे असा टोला देखील या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लावला.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्य सरकारनेही महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत याचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि त्याच्या आघाडीला हे सहन होत नाही. महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेची देशात चर्चा होत आहे.

पण काँग्रेस या योजना बंद करण्यासाठी षडयंत्र रचत आहे. ह्यांचे लोक योजना बंद करण्यासाठी थेट कोर्टात गेले. काँग्रेसला सत्ता मिळाली तर सर्वात आधी या योजनेला बंद करतील. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेने या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img