देशाची राज्यघटना दाखविणं व जातीनिहाय जनगणनेची मागणी करणं हे भाजपसाठी नक्षली विचार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य हे राज्यघटनेचे शिल्पकार (Rahul Gandhi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारं आहे, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवरून केली आहे. राहुल गांधी यांनी लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेली राज्यघटनेची प्रत सभेत दाखवण्यावरून फडणवीस यांनी टीका केली होती. लाल रंग हा नक्षली विचाराच्या जवळचा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याचा राहुल गांधी यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपची ही विचारसरणी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान करणारी आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी संविधान बचावची लढाई लढली व महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले. डॉ. बाबासाहेबांचा हा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापी सहन करणार नाही. काँग्रेस व महाविकास आघाडीचे घटकपक्ष संविधानावर होत असलेल्या हल्ल्याचा मुकाबला करतील. भाजपचे हे लज्जास्पद प्रयत्न अपयशी ठरतील व जाती जनगणना होईल असंही ते म्हणाले आहेत.
धोका धर्माला नाही, आरक्षणाला; प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींना दिला गंभीर इशारा
आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा संविधान हे पवित्र असून तो आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत असून, हे दुर्दैवी आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे संविधान असले पाहिजे. या उद्देशाने राहुल गांधी संविधानाबाबत प्रभावीपणे जनजागृती करत आहेत. ह्याच पॉकेट संविधानाची एक प्रत तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्वतः पंतप्रधानांनी भेट दिली होती. याबाबत फडणवीसांचे काय मत आहे? अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.