3.7 C
New York

Chhagan Bhujbal : ‘ईडीपासून मुक्ती मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो’, भुजबळांचा खुलासा

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठीच आपण भाजपसोबत गेल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पु्स्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकातील दाव्याने राज्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. कारण सध्या निवडणुका सुरू आहेत. त्यातही छगन भुजबळ भाजपबरोबर सत्तेत आहेत. अशा परिस्थितीत हा प्रकार समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबरील सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वच नेत्यांना झाला होता. याचं कारण अर्थातच ईडीपासून सुटका हेच होतं. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. माझ्यासाठी तर हा पुनर्जन्मच होता असे छगन भुजबळ सुचित करतात. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. सरदेसाई यांनी आणखीही काही खळबळजनक दावे या पुस्तकात केले आहेत. छगन भुजबळ ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांना पुनर्जन्म झाल्यासारखं वाटू लागलं असं या पुस्तकात म्हटलं आहे. ईडीच्या जाचातून सुटका झाल्यानंतर मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं असे भुजबळ म्हणाल्याचे या पुस्तकात राजदीप सरदेसाई यांनी नमूद केलं आहे.

फडणवीस यांनी संविधानाच्या रंगावरून केलेल्या टिकेवर राहुल गांधी भडकले

ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांत होती. त्यामुळेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं. यामध्ये सुनेत्रा पवार यांचंही नाव आलं होतं. तुरुंगात असतानाच अनिल देशमुख यांना भाजपसोबत येण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. शरद पवार यांना या गोष्टींची माहिती होती. परंतु, ते भाजप सोबत जाण्यास तयार नव्हते असा खळबळजनक दावा राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकात केला आहे.

दरम्यान, राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या पुस्तकातील दावे बाहेर आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीला घेरण्याची आणखी एक संधी विरोधकांना मिळणार आहे. तसेही विरोधक भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापराचा आरोप करतच असतात. त्यानंतर आता या पुस्तकातील दाव्यांवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img