11.5 C
New York

Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Published:

वादग्रस्त ठरल्यानंतर आयएएस पद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, यापूर्वी तिने अटकेपासून संरक्षण मिळवलेलं होतं. दरम्यान, (Pooja Khedkar) आज या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त संधी मिळाव्यात यासाठी पूजा खेडकरने नावात बदल करुन शासनाची फसवणूक केली होती. त्यामुळे तिच्यावर यूपीएससीने गुन्हा दाखल करुन तिचं आयएएस पद रद्द केलं होतं. तसंच, तिने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आई-वडिलांपासून विभक्त राहात असल्याची कागदपत्रं बनवली होती.

‘ईडीपासून मुक्ती मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो’, भुजबळांचा खुलासा

याशिवाय बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून पूजाने आरक्षणाचा लाभ घेतला, असाही आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे यूपीएससीने पूजावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, तिला अद्याप अटक होऊ शकलेली नाही. पूजाने अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी कोर्टात धाव घेतलेली आहे.

आज शुक्रवारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला जावा, अशी मागणी केली आहे.

जामीन अर्जावर पूजा खेडकरच्या सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरवेळी पुढील तारखेपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण मिळते आहे. त्यामुळे आज नेमकं काय होणार, याकडं लक्ष लागून राहिलं आहे. खोटी कागदपत्र देत पूजा खेडकरने अनेक वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img