आज दुपारी १२ वाजता राज्य मंत्रिमंडळाची होणार बैठक
माजी आमदार प्रदीप नाईक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदार संघाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
बीडच्या मस्साजोग येथे आज गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज मस्साजोग ग्रामस्थांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.
कोरेगाव भीमा परिसरात सीसीटिव्ही ची करडी नजर
कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभावर आज २०७ वा शौर्यदिन साजरा होतोय या निमित्ताने लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगाव भिमात दाखल होत असुन चोरीच्या घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे नगर मार्गासह विजयस्तंभ परिसरात सीसीटिव्ही कँमेराच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जातेय चोरी,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस अलर्टमोडवर आहे
सांगली पोलिसांचा मद्यापी, हुल्लडबाजांना दणका
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर सांगली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यात 40 ठिकाणी नाकेबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पहाटेपर्यंत सुमारे 500 पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात होते. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली. यामध्ये हद्दपार तडीपार आणि सराईत गुन्हेगागारांचा शोध घेण्यात आला. तर स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी रात्री उशिरा अनेक ठिकाणी फिरून तपासणी नाक्यांची पाहणी देखील केली.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आणि त्यामुळेच म मंदिराचे बाहेर एक ते दीड किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा लागले आहे तर चार ते पाच तास रांगेत उभे राहून दर्शनाला लागत आहे नवीन वर्षाचे पहिले दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक नाशिक मध्ये दाखल झाले आहे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटना बरोबरच मंदिरात दर्शनाचा योग जुळून आणला आहे आणि त्यामुळे सर्व पर्यटन स्थळ आणि देवस्थानंवर मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळत आहे.