3.7 C
New York

Chhagan Bhujbal : भुजबळ आक्रमक, पुस्तकातील दावे फेटाळत दिला कारवाईचा इशारा; म्हणाले

Published:

ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठीच आपण भाजपसोबत गेल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितलं होतं असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पु्स्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकातील दाव्याने राज्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. राजकीय वर्तुळात या दाव्याची जोरदार चर्चा होत असतानाच आज खुद्द छगन भुजबळ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पुस्तकातील सर्व दावे फेटाळून लावले आहेत. नेमक्या निवडणुकीच्या काळातच पुस्तकातील दावे समोर आल्याने भुजबळांनी या पुस्तकाच्या हेतूवरही शंका उपस्थित केली आहे. आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

पुस्तकांतील दाव्यांबाबत प्रश्न विचारल्यावर भुजबळ म्हणाले, मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो हा आरोप आमच्यावर अनेक दिवसांपासून होत आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयानेच आम्हाला क्लिन चीट दिली आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते, अशी आठवण भुजबळांनी यावेळी करून दिली. आम्ही सर्व फक्त विकासासाठीच भाजपसोबत गेलो. आम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास करू शकलो. आजमितीस माझ्या मतदारसंघात जवळपास दोन हजार कोटींची कामं सुरू आहेत. भाजपसोबत गेल्याने मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्हाला फायदाच झाला. परंतु, पुस्तक आताच का छापण्यात आलं हे काही मला कळलेलं नाही. आता हे पुस्तक मी स्वतः वाचणार आहे. माझ्या वकिलांनाही वाचण्यास देईन त्यानंतर आठ दिवसांत जी काही कारवाई करायची असेल ती करू असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

कॉंग्रेसच्या शिलेदारांसाठी प्रियांका गांधी मैदानात

या पुस्तकात नको नको त्या गोष्टी छापल्या आहेत. यामागे नेमका काय हेतू आहे याची मला कल्पना नाही. निवडणुकीमुळे मी सध्या खूप व्यस्त आहे. निवडणुकीनंतर मी माझ्या वकिलांशी बोलून यावर निर्णय घेणार आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal पुस्तकात नेमकं काय ?

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. सरदेसाई यांनी आणखीही काही खळबळजनक दावे या पुस्तकात केले आहेत. छगन भुजबळ ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांना पुनर्जन्म झाल्यासारखं वाटू लागलं असं या पुस्तकात म्हटलं आहे. ईडीच्या जाचातून सुटका झाल्यानंतर मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं असे भुजबळ म्हणाल्याचे या पुस्तकात राजदीप सरदेसाई यांनी नमूद केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img