निळेभोर आकाशाकडे पाहायला सगळ्यांनाच आवडतं पण कधी हा विचार केला आहे का, की आकाश निळेच का दिसतं ? हाच प्रश्न एका महान वैज्ञानिकाला पडला होता. त्याच वैज्ञानिकाच्या (C.V.Raman) जयंतीनिमित्त आकाश निळेच का दिसते?’ या कुतुहलातून जगाला दिशा देणाऱ्या ‘रामन इफेक्ट’चा शोध लावणारे महान शास्त्रज्ञ सर सी.व्ही.रमण आहेत तरी कोण हे जाणून घेऊयात.
विज्ञानाने आपले जीवन किती सोपे केले आहे.याचा शोध आपण कधीतरी घेतलाच पाहिजे.आज भारत विज्ञानात खूप प्रगतशील झाला असून भारताने नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे.विज्ञानाच्या मदतीने आपण अवकाशात पोहचू शकलो. त्याचबरोबर आपण रोबोट आणि संगणक तयार करू शकलो. म्हणूनच विज्ञानाला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. भारताने विज्ञान क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. अनेक महान शास्त्रज्ञ भारतात जन्माला आले आणि त्यांनी भारताला विज्ञान क्षेत्रात एक अनोळखी ओळख मिळवून दिली. भारताने जगातील विज्ञान क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. 28 फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
चंद्रशेखर वेंकटरामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ साली झाला. त्यामुळे याच दिवशी महान शास्त्रज्ञ सी.व्ही रामन यांची जयंती साजरी केली जाते. ते एक भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते आणि भारतरत्न प्राप्तकर्ते होते. ज्यांनी विज्ञान आणि भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात भारताच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ७ नोव्हेंबर १८८८ रोजी दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली येथे सी.व्ही रमण या महान शास्त्रज्ञाचा जन्म झाला. सी.व्ही रमण, यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण. त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे व्याख्याते होते. तरुण वयातच त्यांना शैक्षणिक वातावरणाचा सामना करावा लागला. विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनातील त्यांच्या योगदानामुळे भारत आणि जगाला मदत झाली. चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी रमन इफेक्टचा शोध लावला आणि या शोधाबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
सी.व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि या खनिजांच्या प्रकाश-विकिरणाच्या गुणधर्मांंचा अभ्यास केला.’आकाश निळेच का दिसते?’ या कुतुहलातून सी.व्ही. रामन यांनी जगाला एक नवी दिशा दिली. विज्ञान क्षेत्रातील मानाचा नोबेल पुरस्कार मिळवणारे महान वैज्ञानिक भारतरत्न सर.सी.व्ही.रमण हे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील अभिमान आहेत.
संशोधनाकडे कल असल्याने त्यांनी १९१७ साली सरकारी नोकरीला रामराम केला आणि कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम सुरु केले.1921 साली कोलकाता विद्यापीठातर्फे त्यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवण्यात आले. त्याच वेळेस जहाजातून प्रवास करताना आकाशात सर्वत्र दिसणाऱ्या निळ्या रंगाने त्यांच्या मनात कुतुहूल निर्माण केले.त्यामुळे रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणावर म्हणजे स्कॅटरिंगवर संशोधनाला सुरुवात केली.1928 मध्ये भूमध्यसागराच्या प्रवासादरम्यान सूर्योदयाचे निरीक्षण करताना सर सी. व्ही. रमनांच्या लक्षात आले की, समुद्राचा निळा रंग हा सूर्यप्रकाशाशी थेट संबंधित आहे.
त्यांनी प्रयोगशाळेत परत आल्यावर या घटनेचा सखोल अभ्यास केला आणि 1928 मध्ये त्यांनी “रमन इफेक्ट” (The Raman Effect) या नावाने प्रसिद्ध असलेला क्रांतिकारी शोध जगाला दिला.रामन स्पेक्ट्रोस्कोपीचा(रामन वर्णपंक्तीशास्त्र) वापर करुन चांद्रयान-1 ने चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा शोधण्यात आला होता.1954 साली सर. सी व्ही रमण यांचा ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता आणि अशारितीने एक महान शास्त्रज्ञ आपल्या भारताला लाभला.