“महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या प्रचाराची सुरुवात काल पासून झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्यावतीने मी स्वत: उपस्थित होतो” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ‘मी दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. नागपूरला तीन सभा घेणार आहे’ असं शरद पवार यांनी सांगितलं. “मला विश्वास आहे, महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवा आहे. परिवर्तन पाहिजे आहे. आत्मविश्वास वाढवायचं काम आम्हाला करावं लागेल. आम्ही सर्व सहकारी आजपासून ठिकठिकाणच्या दौऱ्यावर जाणार आहेत” असं शरद पवार म्हणाले.
‘महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’ सदाभाऊ खोत यांनी असं वादग्रस्त वक्तव्य काल केलं. त्यावर शरद पवारांना विचारलं असता, त्यांनी बोलणं टाळलं. भाजपात ज्या नावाची मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते, तो होत नाही, असं तावडे म्हणाल्याच पत्रकारांनी विचारलं. शरद पवारांनी त्यावर याची अंतर्गत माहिती त्यांना अधिक आहे असं उत्तर दिलं.
बेलापूर-151 नवी मुंबईचे उमेदवार विजय नहाटा यांचं मतदारांना आवाहन, म्हणाले
Sharad Pawar आरक्षणावर शरद पवार काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, जातीय जनगणना होणार. 50 टक्क्यांच्या वर आरक्षणाची मर्यादा तोडू नन्यायची वेळ आलीय, त्यावर शरद पवार म्हणाले की, “मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो. जातीय जगनणनेची मागणी आम्ही मागच्या तीन वर्षांपासून करत आहोत. ती झालीच पाहिजे, त्यातून वास्तव चित्र देशासमोर येईल. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी ते आल्यानंतरच निर्णय घेता येईल”